Headlines

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची खासदारांसोबतची बैठक संपली, कोण हजर, कोण गैरहजर? यादी समोर

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची खासदारांसोबतची बैठक संपली, कोण हजर, कोण गैरहजर? यादी समोर
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची खासदारांसोबतची बैठक संपली, कोण हजर, कोण गैरहजर? यादी समोर


मोठी बातमी समोर येत आहे, आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर खासदारांची बैठक बोलावली होती. ही बैठक आता संपली आहे. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. शिवसेना ठाकरे गटाचे सात खासदार हे शिवसेना शिंदे गटाच्या संर्पकात असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या या बैठकीला किती खासदार हजर राहणार याबाबत मोठी उत्सुकता होती, अखेर या बैठकीला हजर असलेल्या खासदारांची यादी समोर आली आहे. याबाबत बैठकीनंतर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली आहे.

संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे 9 पैकी 9  खासदार उपस्थित होते. 9 पैकी 4 खासदार या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित होते. तर 5 खासदार हे या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांनी ऑनलाईन हजेरी लावली असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील, राजाभाऊ वाझे हे खासदार या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित होते. तर दुसरीकडे  ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाघचौरे, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख आणि संजय जाधव हे सर्व खासदार या बैठकीसाठी ऑनलाईन उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे.

जे खासदार ऑनलाईन उपस्थित होते, त्यापैकी ओमराजे निंबाळकर यांचा मुलगा आजारी असल्यामुळे ते आजच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत, तसेच दुसरीकडे खासदार संजय जाधव हे धोंडे जेवणाच्या कार्यक्रमामुळे या बैठकीला येऊ शकले नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान  उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या या बैठकीला 9 पैकी 9 खासदार उपस्थित होते, सर्व खासदार आमच्यासोबतच आहेत, असंही यावेळी संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये अनेक खासदारांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडली आहे. तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील खासदारांची बैठक बोलावल्याने ऑपरेशन टायगरच्या चर्चेला उधाण आलं होतं. या बैठकीला आदित्य ठाकरे यांची देखील उपस्थित होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *