Headlines

सरकार कर्जमाफीचे नियम बदलण्यास तयार? सर्वात मोठी खशुखबर समोर; बड्या नेत्याने थेट सांगून टाकलं!

सरकार कर्जमाफीचे नियम बदलण्यास तयार? सर्वात मोठी खशुखबर समोर; बड्या नेत्याने थेट सांगून टाकलं!
सरकार कर्जमाफीचे नियम बदलण्यास तयार? सर्वात मोठी खशुखबर समोर; बड्या नेत्याने थेट सांगून टाकलं!


Rohit Pawar Hunger Strike : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, या मागणीला घेऊन शरद पवार यांच्या पक्षाचे नेते तथा आमदार रोहित पवार अन्नत्याग आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला शेतकरी तसेच वेगवेगळ्या समाजघटकांकडून पाठिंबा मिळत आहे. रोहित पावर यांनी अन्नत्याग केल्याने त्यांचे कुटुंबीयदेखील आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, आता या आंदोलनाला वाढता पाठिंबा लक्षात घेता सरकारवरील दबाव वाढत आहे. मंत्री गिरीश महाजन हे रोहित पवार यांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत. असे अतानाच राष्ट्रवादी पक्षाचे नेते तथा आमदार दिलीप विळसे पाटील यांनी रोहित पवार यांचे आंदोलन आणि सरकारची भूमिका याविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे.

सरकार कर्जमाफीमधील नियमांमध्ये बदल करण्यासाठी तया

रोहित पवार सध्या पंढरपुरात अन्नत्याग आंदोलनासाठी बसले आहेत. त्यांच्या प्रकृतीकडे डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. रोहित पवार हे पुणे जिल्ह्यातील मंचरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना रोहित पवार यांचे आंदोलन आणि सरकारची भूमिका याविषयी विचारण्यात आले. यावर बोलताना सरकार कर्जमाफीमधील नियमांमध्ये बदल करण्यासाठी तयार आहे, अशी महत्त्वाची माहिती त्यांनी दिली आहे. सोबतच चर्चेतून मार्ग निघेल, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.

रोहित पवार यांनी नेमका काय इशारा दिला?

गिरीश महाजन हे सरकारचे मंत्री आंदोलनस्थळी येत आहेत. ठोस असे आश्वासन मिळेल असा मला विश्वास आहे. सरकारचा प्रतिनिधी येथे आल्यावर आपण चर्चा करू. ते काही तरी शब्द देतील असा मला विश्वास आहे, अशी भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे. तसेच आज दिलेला शब्द न पाळल्यास आषाढी एकादशीला मुख्यमंत्री पूजेला आल्यावर शेतकरी काय निर्णय घ्यायचा तो घेतील, असा इशाराही यावेळी रोहित पवार यांनी दिला.

सरकारकडून कोणता प्रस्ताव?

दुसरीकडे मंत्री गिरीश महाजन हे रोहित पवार यांची भेट घेणार आहेत. महाजन आता सरकारकडून कोणता प्रस्ताव घेऊन जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच महाजन यांनी दिलेला प्रस्ताव रोहित पवार मान्य करणार का? याकडेही सर्वांचेच लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *