Headlines

राऊतांच्या शेजारी बसलेला खासदारही… सातवा खासदार कधी फुटणार? मोठी अपडेट आली समोर; ऑपरेशन टायगर आधीच होणार होतं, पण…

राऊतांच्या शेजारी बसलेला खासदारही… सातवा खासदार कधी फुटणार? मोठी अपडेट आली समोर; ऑपरेशन टायगर आधीच होणार होतं, पण…
राऊतांच्या शेजारी बसलेला खासदारही… सातवा खासदार कधी फुटणार? मोठी अपडेट आली समोर; ऑपरेशन टायगर आधीच होणार होतं, पण…


सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूंकप आल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या 9 खासदारांपैकी 6 खासदार फुटणार असल्याचे बोलले जात आहे. ठाकरे गटासाठी हा सर्वात मोठा धक्का असणार आहे. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) मधील फुटण्याची प्रक्रिया अजून थांबलेली नाही, अशी मोठी अपडेट सूत्रांकडून समोर आली आहे. ज्या चार खासदारांनी आज राऊतांच्या शेजारी बसून पत्रकार परिषद घेतली, त्यापैकी एक खासदार देखील शिंदे गटात येण्यास पूर्णपणे तयार होता, अशी धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

तीन महिन्यांपूर्वीच झाली होती तयारी

सूत्रांच्या माहितीनुसार, तीन महिन्यापूर्वी झालेल्या एका अत्यंत गोपनीय बैठकीत हा खासदार शिवसेना शिंदे गटात सामील होण्यास राजी झाला होता. त्या वेळी ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्याची तयारी पूर्ण झाली होती. मात्र, ऐन वेळी काही अडचण निर्माण झाल्याने ही मोहीम रद्द करण्यात आली. आता जेव्हा पुन्हा एकदा खासदार ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह इतर नेते दिल्लीकडे रवाना झाले, तेव्हा या खासदाराने येण्यास नकार दिला. आज खासदार संजय राऊत यांच्या शेजारी बसून त्याने ठाकरे गटाची बाजू मांडली अशी माहिती सूत्रांनी दिली.

सातवा खासदार कधी फुटणार?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन महिन्यांत सातवा खासदार देखील फुटणार आहे. सध्या सुरू असलेल्या घडामोडी ही फक्त सुरुवात आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ठाकरे गटातील एकूण सात खासदारांवर सध्या शिंदे गटाचे लक्ष आहे.

ऑपरेशन टायगरची पार्श्वभूमी

यापूर्वी तीन महिन्यांपूर्वी जेव्हा हा खासदार तयार झाला होता, तेव्हा श्रीकांत शिंदे यांच्या नावावर विमानांची व्यवस्था देखील करण्यात आली होती. मात्र शेवटच्या क्षणी काही अडथळे आल्याने ऑपरेशन टायगर यशस्वी होऊ शकले नाही. आता पुन्हा एकदा दिल्लीत बैठका, खासगी विमानांची व्यवस्था आणि नेत्यांची रवानगी यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे. मात्र, सूत्रांनी स्पष्ट सांगितले आहे की, “फोडाफोडी” ची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही आणि येत्या काही दिवसांत किंवा महिन्यांत आणखी एक मोठा धक्का बसणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *