Headlines

कुठे गाढवावरुन धिंड तर कुठे दुग्धाभिषेक, शिवसेना बंडखोर खासदारांचे समर्थक-विरोधक आमने -सामने

कुठे गाढवावरुन धिंड तर कुठे दुग्धाभिषेक, शिवसेना बंडखोर खासदारांचे समर्थक-विरोधक आमने -सामने
कुठे गाढवावरुन धिंड तर कुठे दुग्धाभिषेक, शिवसेना बंडखोर खासदारांचे समर्थक-विरोधक आमने -सामने


शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाल चिन्हावरुन निवडून आलेल्या ९ खासदारांपैकी ६ खासदारांना फोडण्याचा विडा एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दरबारी उचलल्याने आणि त्यास शिवसेनेच्या हिरकमहोत्सवी वर्धापन दिनाचा मुहूर्त निवडल्याने राज्यभरात निदर्शने सुरु आहेत. परभणी, अहिल्यानगरात बंडखोर खासदारांच्या प्रतिमांना जोडे मारणे आणि कुठे गाढवांवरुन या प्रतिमांची मिरवणूक काढणे असे प्रकार घडले. तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांनी या खासदारांच्या प्रतिमांना नंतर दुग्धाभिषेक करुन त्यांची मिरवणूक काढली.

परभणीच्या सोनपेठमध्ये ठाकरे शिवसेना कार्यकर्ते आणि खासदार बंडु जाधव यांचे समर्थक आमने -सामने आले होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खासदार बंडू जाधव यांची अंत्ययात्रा काढल्यामुळे चिडलेल्या खासदार संजय जाधव यांच्या समर्थकांनी त्याच ठिकाणी जाधव यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक केला. खासदार जाधव यांची गाडी फोडण्याची भाषा कारण्यांनी आधी आमच्याशी खेटावे असे खासदार संजय जाधव यांच्या समर्थकांनी प्रतिउत्तर दिले आहे.

अहिल्यानगरात फुटीर खासदारांच्या विरोधात ठाकरे शिवसेनेने आंदोलन केले आहे.बंडखोर खासदारांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे शिवसेनेसोबत राष्ट्रवादी शरद पवार गट आणि आरपीआय (गवई गट) देखील आंदोलनात सहभागी झाल्याचे चित्र होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत बंडखोर खासदारांच्या प्रतिमा पायदळी तुडवल्या.

तोडफोड करणारे आमच्याकडेच आहेत – राजू कापसे

परभणीचे खासदार संजय जाधव उद्धव ठाकरे यांना सोड चिट्ठी देणार असल्याच्या मुद्यावरून ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. संजय जाधव यांची गाडी फोडू आणि त्यांना फिरू देणार नसल्याचे आव्हान दिले जात आहेत. यावर खासदार संजय जाधव यांच्या समर्थनात शिंदे सेना आता मैदानात उतरल्याने ठाकरे सेना आणि शिंदे सेना आमने -सामने आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिंदे सेनेचे परभणीचे लोकसभा प्रमुख राजू कापसे यांनी तोडफोड करणारे आमच्याकडेच आहेत असे म्हणत ठाकरे सेनेला डिवलचले आहे.

“फुटीर खासदारांनी आधी राजीनामे द्यावेत” – किरण काळे

ठाकरे शिवसेनेच्या खासदारांनी केलेल्या बंडानंतर अहिल्यानगरमध्ये कार्यकर्त्यांमध्ये संताप पाहायला मिळात आहे. ठाकरे शिवसेनेसह, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने फुटीर खासदारांच्या प्रतिमांची गाढवावरुन मिरवणूक काढत त्यांच्या प्रतिमांना जोडे मारत आंदोलन केले आले. खरंतर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या जीवावर एकेकाळी रिक्षावाला असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी सर्व काही मिळवले आहे. ज्या ताटात जेवले तिथेच घाण केली आहे. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांनी टीका केली आहे.फुटलेल्या खासदारांनी राजीनामे द्यावेत आणि मग शेण खावे असेही किरण काळे यांनी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *