Headlines

ठाकरे आणि शिंदेंच्या कोणत्या शिलेदारांच्या तोफा धडाडणार? शिंदे गटाला काळ्या रंगाचा धसका? सभेला जाणार असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवा

ठाकरे आणि शिंदेंच्या कोणत्या शिलेदारांच्या तोफा धडाडणार?  शिंदे गटाला काळ्या रंगाचा धसका? सभेला जाणार असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवा
ठाकरे आणि शिंदेंच्या कोणत्या शिलेदारांच्या तोफा धडाडणार?  शिंदे गटाला काळ्या रंगाचा धसका? सभेला जाणार असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवा


Eknath Shinde, Uddhav ThackerayImage Credit source: टीव्ही 9 मराठी

आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनानिमित्त शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाचा मेळावा पार पडणार आहे. शिवसेना ठाकरे गटात नुकतीच मोठी फुट पडली आहे. 9 पैकी सहा खासदारांनी बंडखोरी केली आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सुरुवातील एक तास स्टँडअर कॉमेडीचा शो होणार आहे. मंदार भिडे हे या कार्यक्रमाचं सदारीकरण करणार आहेत. तर दुसरीकडे दंगलफेम चंदनशिवे यांच्या कवितेच्या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर भगवा या विषयावर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचं भाषण देखील होणार आहे.

दरम्यान यावेळी शिवसेना ठाकरे गटाकडून फक्त दोनच नेत्यांची भाषण होणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे या दोघांचंच भाषण होणार आहे. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान दुसरीकडे शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना शिंदे गटाकडून गोरेगाव नेस्को येथे मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात  खासदार ज्योती वाघमारे, मंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या चार नेत्यांची भाषणं होणार आहेत. या कार्यक्रमासाठी जी आसन व्यवस्था करण्यात आली आहे, त्या प्रत्येक खुर्चीवर शिवसेनेचा गमछा ठेवण्यत आलेला आहे.

दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार कार्यक्रमात होऊ नये, यासाठी पोलिसांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. नेस्को सेंटर येथे होत असलेल्या या कार्यक्रमात काळ्या रंगाचे कपडे घालून सभागृहात प्रवेश करणे तसेच काळ्या रंगाचे पावर बॉक्स सोबत बाळगणे याला पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *