Headlines

सातारा-सांगली विधान परिषदेत भलतंच घडलं; 192 मतं असलेल्या उमेदवाराला मिळाली 292 मतं, तरी…

सातारा-सांगली विधान परिषदेत भलतंच घडलं; 192 मतं असलेल्या उमेदवाराला मिळाली 292 मतं, तरी…
सातारा-सांगली विधान परिषदेत भलतंच घडलं; 192 मतं असलेल्या उमेदवाराला मिळाली 292 मतं, तरी…


सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी विजय मिळवला असला तरी या निकालामुळे महायुतीत मोठी खळबळ उडाली आहे. कारण या निवडणुकीत महायुतीची तब्बल 100 मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. ही सर्व मते महाविकास आघाडीच्या उमेदवार अभयसिंह जगताप यांच्या पारड्यात गेल्याची चर्चा सुरू आहे. कारण मविआतील उमदेवाराकडे 192 मतंच होती मात्र त्यांना 292 मतं मिळाली.

निवडणुकीपूर्वीच महायुतीत अंतर्गत वाद आणि नाराजी असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. वरिष्ठ नेत्यांनी नाराजी दूर करण्यासाठी अनेक बैठका घेतल्या होत्या. शेवटच्या क्षणापर्यंत मतभेद मिटल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र निकालातून महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

या निवडणुकीत धैर्यशील कदम यांना 593 मते मिळाली. त्यांनी विजय मिळवला असला तरी फुटलेल्या मतांमुळे महायुतीसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, पराभवानंतर अभयसिंह जगताप यांनी प्रतिक्रिया देताना ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी असल्याचे सांगितले. माझा पराभव झाला असला तरी संघर्ष सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *