Headlines

Vaibhav Sooryavanshi ला वारंवार दुखापती होतील, दक्षिण आफ्रिकेचा मोठा खेळाडू हे वाईटासाठी नाही बोलला, त्याने जे हेरलं ते खूप महत्वाचं

Vaibhav Sooryavanshi ला वारंवार दुखापती होतील, दक्षिण आफ्रिकेचा मोठा खेळाडू हे वाईटासाठी नाही बोलला, त्याने जे हेरलं ते खूप महत्वाचं
Vaibhav Sooryavanshi ला वारंवार दुखापती होतील, दक्षिण आफ्रिकेचा मोठा खेळाडू हे वाईटासाठी नाही बोलला, त्याने जे हेरलं ते खूप महत्वाचं


टीम इंडियाचा उदयोन्मुख स्टार वैभव सूर्यवंशीने काल तुफान बॅटिंग केली. श्रीलंका अ विरुद्ध फायनलमध्ये वैभवने 29 चेंडूत 94 धावा चोपल्या. श्रीलंका अ कडून सुपर ओव्हरमध्ये झालेल्या पराभवाचा हिशोब चुकता केला. त्याने सामन्याचा नूरच पालटून टाकला. वैभवने श्रीलंकन गोलंदाजांवर हल्ला चढवला. 10 फोर आणि 8 सिक्स मारले. वैभवने त्याच्या या वादळी खेळीने भारतातील लाखो क्रिकेट चाहत्यांचं मन जिंकलं. पण दक्षिण आफ्रिकेचे माजी अव्वल खेळाडू डॅरिल कलिनन यांनी 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या फिटनेसबद्दल चिंता व्यक्त केली आहे. डॅरिल कलिनने वैभवच्या फिटनेसबद्दल खूप बारीक गोष्ट हेरली. वैभव सूर्यवंशीच्या बॅटचा जो स्विगं आहे, त्यामुळे त्याच्या शरीरावर ताण वाढतो असं डॅरिल कलिनने म्हटलं आहे. सूर्यवंशीचा खेळ पावर हिटिंगवर आधारीत आहे. त्यासाठी प्रत्येक शॉटवर बॅटचा प्रचंड वेग लागतो. टायमिंग आणि तंत्र सुद्धा तितकचं महत्वाचं आहे. सूयवंशी जोरदार फटके खेळण्यावर भर देतो, त्यामुळे भविष्यात वैभवला वारंवार दुखापतीचा सामना करावा लागू शकतो अशी भिती कलिनन यांनी व्यक्त केली.

“मलाही वैभवबद्दल कौतुक वाटतं. पण मला त्याच्या दुखापती बद्दल जी चिंता वाटते, त्या बद्दल कोणी बोलत नाही. वयाच्या 15 व्या वर्षी तो जितकं जास्त क्रिकेट खेळतोय, त्याच्या बॅटचा जो स्विंग आहे, त्यामुळे मला त्याच्या मनगटाची, हाताच्या कोपऱ्याची भिती वाटते. सांध्यांबद्दल वैद्यकीय मत काय सांगतं?. लक्षात ठेवा, खराब कोपरामुळे सचिनच बरचसं करिअर कमी झालं. पण तो सूर्यवंशी इतकी जोरात बॅट फिरवत नव्हता” असं कलिनने सूर्यवंशीच्या 94 धावांच्या मॅचविनिंग इनिंगनंतर लिंकडीनवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

याच आठवड्यात वैभव सूर्यवंशी भारताकडून डेब्यु करु शकतो

दोन दृष्टीने तुम्ही याकडे बघू शकता. सूर्यवंशीचं वय वाढेल तसं त्याचे स्नायू आणि हाडं अजून मजबूत होतील. त्यामुळे त्याचा पावर गेम अजून वाढेल. तो नैसर्गिक अॅथलेटिक क्रिकेटर नाहीय. त्याच्या फिल्डिंगवर काही एक्सपर्ट्सनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. त्याला त्याचा फिटनेस सतत वाढवत रहावा लागेल. या आठवड्यात वैभव सूर्यवंशी भारताकडून डेब्यु करु शकतो. “वैभव सूर्यवंशी नेहमीच अशी जोरात बॅट फिरवत राहिला, तर त्याच्या स्नायू आणि सांध्यांवरील ताण वाढत जाईल” असं कलिनन यांचं मत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *