Headlines

मोठी बातमी! 6 बंडखोर खासदार शिंदेंच्या निवासस्थानी, 7 व्या खासदारने टेन्शन वाढवलं, ठाकरेंना बसणार आणखी एक मोठा धक्का?

मोठी बातमी! 6 बंडखोर खासदार शिंदेंच्या निवासस्थानी, 7 व्या खासदारने टेन्शन वाढवलं, ठाकरेंना बसणार आणखी एक मोठा धक्का?
मोठी बातमी! 6 बंडखोर खासदार शिंदेंच्या निवासस्थानी, 7 व्या खासदारने टेन्शन वाढवलं, ठाकरेंना बसणार आणखी एक मोठा धक्का?


शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर खासदार शिंदेंच्या निवासस्थानी Image Credit source: टीव्ही 9 मराठी

शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, शिवसेना शिंदे गटाच्या 6 खासदारांनी बंडखोरी केली आहे. रविवारपर्यंत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची भूमिका तळ्यात मळ्यात होती. मात्र अखेर त्यांनी देखील रविवारीच आपण शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं, त्यामुळे बंडखोर खासदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. अखेर आता हे सर्व बंडखोर खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी दाखल झाले आहेत. या सर्व खासदारांची एकनाथ शिंदेंसोबत बैठक होणार आहे, त्यानंतर या खासदारांच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. हा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मात्र एकीकडे या सर्व घडामोडी घडत असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 6 नाही तर 7 खासदारांची स्वाक्षरी असल्याचा दावा कदम यांनी केला आहे. 6 खासदार तर आधीच शिंदेंच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत, मात्र आता कदम यांच्या या दाव्यामुळे 7 व्या खासदाराबद्दल मोठा सस्पेन्स निर्माण झाला असून, ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नेमकं काय म्हणाले कदम? 

6 नाही तर 7 खासदारांनी स्वाक्षरी केली आहे. आज 6 खासदार शिवसेनेत प्रवेश करत आहेत.  एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं, मी कुठलंही ऑपरेशन अर्धवट सोडत नाही. आज संध्याकाळी चार वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हे सहाही खासदार शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मला एकनाथ शिंदे यांचा अभिमान वाटतो, असं  यावेळी कदम यांनी म्हटलं आहे.  दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत तसेच भास्कर जाधव यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. आपले खासदार का जातात? याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. शिव्या घालणं हे संजय राऊत यांचं कामच आहे.  ते जेवढे शिव्या देतील तेवढा लवकर पक्ष संपणार आहे, असं कदम यांनी म्हटलं आहे. तसेच  भास्कर जाधव हे फक्त काव काव करतात, त्यांना जर मंत्रिपद दिलं तर ते देखील भाजपमध्ये निघून जातील, असंही यावेळी कदम यांनी म्हटलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *