Headlines

Thackeray MLA Meeting | उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?

Thackeray MLA Meeting | उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?
Thackeray MLA Meeting | उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवालय येथे पक्षाच्या सर्व विधानसभा आणि विधान परिषद आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बैठकीसाठी पक्षाचे अनेक आमदार दाखल झाले असून पुढील रणनीतीवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

विधानसभेतील आमदारांमध्ये बाळा नर, संजय देरकर, प्रवीण स्वामी, हारून खान, सुनील राऊत, नितीन देशमुख, अजय चौधरी, आदित्य ठाकरे, कैलास पाटील आणि भास्कर जाधव हे बैठकीला उपस्थित झाल्याचं सांगितलं जात आहे. तसेच आणखी काही आमदार शिवालय येथे दाखल होत असल्याची माहिती समोर आली आहे.

विधान परिषदेतील आमदारांमध्ये अभ्यंकर, सचिन अहीर, सुनील प्रभू आणि मिलिंद नार्वेकर हे देखील बैठकीसाठी पोहोचल्याचं समजतंय. आगामी राजकीय परिस्थिती, पक्ष संघटना आणि आमदारांची भूमिका यावर उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *