Headlines

मोठी बातमी! या दोन खासदारांना लागली लॉटरी, थेट केंद्रात मंत्रिपद मिळणार

मोठी बातमी! या दोन खासदारांना लागली लॉटरी, थेट केंद्रात मंत्रिपद मिळणार
मोठी बातमी! या दोन खासदारांना लागली लॉटरी, थेट केंद्रात मंत्रिपद मिळणार


राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अशातच आता यातीला संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर या दोन खासदारांना केंद्रात दीड-दीड वर्ष मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या ठाकरे गटातील 6 बंडखोर खासदार मुंबईत परतले असून नंदनवन येथे एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत. या भेटीनंतर ते शिवसेनेत प्रवेश करण्याची घोषणा करणार आहेत.

दीड-दीड वर्षे मंत्रिपद

गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होती, त्यानंतर काही दिवसांपूर्वी 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला होता. यात खासदार संजय जाधव आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश होता. आता या खासदारांना शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मंत्रिपद दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोघांना दीड-दीड वर्षे शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद दिले जाणार असल्याचे समोर आले आहे.

संजय राऊत यांची खासदारांवर टीका

आज बंडखोर खासदार मुंबईत दाखल झाले, यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या खासदारांवर सडकून टीका केली आहे. 50 50 कोटीला विकले गेलेले चार खासदार मुंबई विमानतळावर उतरले आणि भेदरलेल्या नजरेने शशस्त्र पोलिस गराड्यात बाहेर पडले. ये जिना भी क्या जिना है लल्लू? चित्रगुप्ताने पापांचा हिशोब लिहायला सुरुवात केली आहे! ह्यांची पुढील पिढी सांगेल. मेरा बाप गद्दार था. मेरा पती गद्दार था. मेरा नाना गद्दार था! जय महाराष्ट्र!

उद्धव ठाकरेंची साथ सोडणारे खासदार कोणते?

  • खासदार संजय जाधव – परभणी
  • खासदार नागेश पाटील आष्टीकर – हिंगोली
  • खासदार संजय देशमुख – यवतमाळ-वाशिम
  • खासदार ओमराजे निंबाळकर – धाराशिव
  • खासदार भाऊसाहेब वाकचौरे – शिर्डी
  • खासदार संजय दिना पाटील – ईशान्य मुंबई

उद्धव ठाकरेंसोबत असणारे खासदार कोणते?

  • खासदार अरविंद सावंत – मुंबई दक्षिण
  • खासदार अनिल देसाई – मुंबई दक्षिण मध्य
  • खासदार राजाभाऊ वाजे – नाशिक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *