Headlines

Ketan Agarwal Murder Case : ‘तिलाही त्याच कड्यावरून धक्का द्या…’, केतन अग्रवाल मर्डर केसवरून भडकली अभिनेत्री

Ketan Agarwal Murder Case : ‘तिलाही त्याच कड्यावरून धक्का द्या…’, केतन अग्रवाल मर्डर केसवरून भडकली अभिनेत्री
Ketan Agarwal Murder Case : ‘तिलाही त्याच कड्यावरून धक्का द्या…’, केतन अग्रवाल मर्डर केसवरून भडकली अभिनेत्री


केतन अग्रवाल मर्डर केसवरून अभिनेत्रीचा संताप

पुण्यातील केतन अग्रवालच्या मृत्यूने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करत असताना या 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला; डोंगरावरून पाय घसरून खाली पडल्याने त्याचा जीव गेला. सुरुवातीला ही घटना म्हणजे अपघाती मृ्त्यू मानली जात होती, मात्र नंतर या केसमध्ये मोठा ट्विस्ट आला. केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिने तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने केतनला डोंगरावरून खाली ढकलल्याचं समोर आलं आणि सगळेच हादरले.

अत्यंत कुशलतेने, कट रचून करण्यात आलेल्या या हत्येमुळे लोकं, आणि पोलिसही हादरले. सियाने असं का केलं, एका निष्पाप तरूणाचा जीव का घेतला असाच सवाल सध्या सर्वांच्या मनात आहे. या घटनेवरून देशभरात चर्चा सुरू असतानाच आता टीव्ही सेलिब्रिटींनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्री हिना खान हिच्यानंतर आता आंचल खुराना हिनेही केतरन अग्रवालच्या हत्येबद्दल दु:ख व्यक्त केलंय. एवढंच नव्हे तर तिने सिया गोयल हिच्याबद्दलही धक्कादायक विधान केलंय.

रोडीज विनरने संतापली

आंचल हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. केतन अग्रवाल हा अवघ्या २६ वर्षांचा होता. एका करोडपतीचा मुलगा आणि दुसऱ्या करोडपतीची मुलगी यांच्यात ‘अरेंज्ड मॅरेज’ ठरलं होतं. दोन्ही कुटुंबे एकमेकांच्या जवळची असल्याने त्यांनी आपल्या मुलांचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्या मुलीचे प्रत्यक्षात दुसऱ्या मुलासोबत, चेतन चौधरीसोबत प्रेमसंबंध होते. तिने याबद्दल आपल्या पालकांना किंवा आपल्या होणाऱ्या पतीला सांगितले असते, तर काही तोडगा निघणं शक्य होतं; पण तसं न करतातिने त्याऐवजी, केतनला कड्यावरून खाली ढकलून दिलं, त्याचा जीव घेणं तिला योग्य वाटलं, असं आंचल म्हणाली.

“एक लक्षात घ्या, हा केवळ एखादा मुलगा किंवा मुलीचा प्रश्न नाही. मला प्रश्न पडलाय की, या पिढीला नक्की झालंय तरी काय? आपण कोणावरही अत्याचार करू नये. सियाने केतनचा जीव घेण्याचं धाडस केलं, पण तिच्या प्रेमसंबंधांबद्दल आई-वडिलांना खरं सांगण्याची हिंमत मात्र तिच्यात नव्हती. हे खरं आहे का ? ती (सिया) घर सोडून पळून जाऊ शकली असती किंवा दुसरं काहीतरी करू शकली असती. पण एखाद्याचा जीव घेण्याची काय गरज होती? हे सगळं चाललंय तरी काय? माझ्या मते, त्या मुलीला त्याच कड्यावरून खाली ढकलून दिलं पाहिजे. या केसबाबात कोर्टात खटलाही चालवला जाऊ नये.” अशी संतप्त प्रतिक्रिया आंचल हिने व्हिडीओतून दिली. तिच्या या व्हिडीओवर विविध कमेंट्स आल्या असून बरीच चर्चा सुरू आहे.

केतन- सिया केस

पुण्यातील प्रसिद्ध व्यापाऱ्याचा मुलगा केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा या वर्षाच्या सुरुवातीला साखरपुडा झाला होता. आणि काही महिन्यांतच, नोव्हेंबर 2026 मध्ये त्यांचं लग्न होणार होतं. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून पॅलेज बूक करण्यात आला होता, खाजगी विमानही तयार ठेवण्यात आली होती, अशी माहिती समोर आलेली होती. केतनने वयाच्या 26 व्या वर्षापर्यंत रिअल इस्टेट व्यवसायात मोठे यश मिळवले होते. 18 जूनला लोहगडावरून पडून त्याचा मृत्यू झाला.. त्याच्या निधनामुळे संपूर्ण कुटुंब हादरले आहे.

केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी सध्या 29 जूनपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. मात्र, या घटनेबाबत सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात असून, सिया आणि चेतन यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *