Headlines

Maharashtra News LIVE : नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे दोषी; 29 जूनला कोर्टाचा निकाल

Maharashtra News LIVE : नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे दोषी; 29 जूनला कोर्टाचा निकाल
Maharashtra News LIVE : नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे दोषी; 29 जूनला कोर्टाचा निकाल


  • 25 Jun 2026 12:55 PM (IST)

    शिर्डीत FDA ची पुन्हा मोठी कारवाई; 650 किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचा पेढा जप्त

    शिर्डीत एफडीएकडून पुन्हा मोठी कारवाई करण्यात आली आहे. तब्बल 650 किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचा पेढा जप्त करण्यात आला आहे. साई मंदिर परिसरातील दुकांनामधून जप्त केलेला पेढा तात्काळ नष्ट करण्यात आला. जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदून सर्व जप्त केलेला पेढा नष्ट करण्यात आला. तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अहिल्यानगर पथकाने ही कारवाई केली.

  • 25 Jun 2026 12:45 PM (IST)

    आमदार रोहित पवार यांचा खासदार ओमराजे निंबाळकर यांना अप्रत्यक्ष टोला

    आमदार रोहित पवार यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. “या भागातील काही लोकं खोटी शपथ खातात, पण मी तसा खोट्या शपथा खाणारा नाही. ते आधी हिरो होते, पण आता सत्ताधारी पक्षात गेल्याने झिरो झाले आहे,” असं वक्तव्य करत ओमराजे यांना त्यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. “शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार नुसते वाचण्यापुरते नसतात. तर ते जगायचे असतात.  म्हणूनच रस्त्यावर उतरून लढत आहोत,” असंही रोहित पवार म्हणाले.

  • 25 Jun 2026 12:35 PM (IST)

    ऑपरेशन टायगरसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रीय नेतृत्वासोबत बैठका- सूत्र

    ऑपरेशन टायगरसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रीय नेतृत्वासोबत बैठका झाल्याची सूत्रांची माहिती आहे. संख्याबळ पूर्ण करण्यास फडणवीसांची शिष्टाई मोलाची ठरली. खासदार फोडण्यासाठी शिंदेंकडून पाच वेळा भाजपश्रेष्ठींची भेट घेण्यात आल्याचं कळतंय. फडणवीसांच्या बैठकांनंतर शिंदेंना दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळाला. सहाव्या खासदाराला फोडण्यात फडणवीसांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

  • 25 Jun 2026 12:25 PM (IST)

    आरोपीला फाशी द्या, नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची कोर्टात मागणी

    नसरापूर प्रकरणातील निकाल कोर्टाने 29 जूनपर्यंत राखून ठेवला आहे. तर आरोपीला फाशी द्या, अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी कोर्टात केली आहे. अशा घटना टाळण्यासाठी फाशीची शिक्षा द्या, अशी विनंती त्यांनी केली आहे. याप्रकरणी आरोपीला गुन्ह्याचा पश्चात्ताप नसल्याचं न्यायाधीशांनी म्हटलं आहे.

  • 25 Jun 2026 12:14 PM (IST)

    नसरापूर प्रकरणी कोर्ट 29 जूनला निकाल देणार

    नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी ठरला असून याप्रकरणी कोर्ट येत्या 29 जूनला निकाल देणार आहे. 29 जूनला भीमराव कांबळेला शिक्षा सुनावली जाणार आहे. पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर इथं साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

  • 25 Jun 2026 12:10 PM (IST)

    आरोपी भीमराव कांबळेला गुन्ह्याचा कोणताही पश्चात्ताप नाही- कोर्ट

    नसरापूरमध्ये चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी ठरला आहे. आरोपीने कृत्य करताना चिमुकलीच्या शरीरावर जखमा केल्या. ही घटना म्हणजे क्रूरतेचा कळस आहे. आरोपीला गुन्ह्याचा कोणताही पश्चात्ताप नाही, असं कोर्टाने म्हटलंय. तर आरोपी भीमराव कांबळेला मृत्यूदंडाची शिक्षा द्या, अशी मागणी वकिलांनी केली आहे.

  • 25 Jun 2026 11:57 AM (IST)

    सह्याद्रीच्या पर्वतरांगा भीमाशंकरच्या पट्ट्यात मान्सूनपूर्व पाऊसाने पेरणी केलेल्या भात पिकांना जीवदान

    सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि भीमाशंकरच्या पट्ट्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे पेरणी केलेल्या भात पिकांना मोठे जीवदान मिळाले असून आदिवासी शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या सरींमुळे दिलासा मिळाला आहे. भात रोपांच्या वाढीसाठी हा पाऊस पोषक ठरणार आहे

  • 25 Jun 2026 11:47 AM (IST)

    जालन्यातील रामनगर महसूल मंडळात सर्वाधिक 109 मिलीमीटर पावसाची नोंद

    जालना जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 21 मिलिमीटर पाऊस झालाय. जिल्ह्यातील चार महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे तर जिल्ह्यात वीज पडल्याने शेतकऱ्यांची चार पशुधन दगावले आहे. शिवाय अनेक भागात घराची पडझड देखील झाली आहे. जालन्यातील रामनगर महसूल मंडळात सर्वाधिक 109 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

  • 25 Jun 2026 11:35 AM (IST)

    जालना जिल्ह्यात अनेक भागांत मागच्या 2 दिवसात पावसाची हजेरी

    जालना जिल्ह्यात अनेक भागात मागच्या 2 दिवसात पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा कपाशी लागवडीत व्यस्त झाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून मोठ्या आणि दमदार पावसाची प्रतीक्षा होती. मात्र मागील दोन दिवसात जिल्ह्यात अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने कपाशी लागवडीला वेग आला आहे. जालना जिल्ह्यातील सोमनाथ, उटवद, जळगाव या परिसरामध्ये शेतकरी बांधव आज सकाळ पासूनच कपाशी लागवड करताना दिसत आहे.

  • 25 Jun 2026 11:25 AM (IST)

    खासदार संजय दिना पाटील यांनी संजय राऊतांबाबत केलेल्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे नाराज

    खासदार संजय दिना पाटील यांनी संजय राऊतांबाबत केलेल्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे नाराज आहेत.  वेढ्यासारखी वक्तव्य खासदारांनी करू नये अशा सर्व खासदारांना एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्या आहेत. वादग्रस्त वक्तव्ये टाळावीत , पक्षाची बदनामी होईल अशी वक्तव्य आमदार खासदार यांना करू नयेत अशी सर्व नेत्यांना सुचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

  • 25 Jun 2026 11:21 AM (IST)

    नसरापूर प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे दोषी

    नसरापूर प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. चिमुकलीवर अत्याचार प्रकरणी भीमराव कांबळे याला पोलिसांनी दोषी ठरवलं आहे. तूच सांग काय शिक्षा देऊ… अशी न्यायाधीशांनी आरोपीला विचारणा केली आहे. आरोपीवरील सर्व आरोप सिद्ध झाले आहेत.. असं कोर्टाने सांगितलं आहे.

  • 25 Jun 2026 11:14 AM (IST)

    धाराशिव मध्ये शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून रोहित पवारांना दिली तलवार भेट

    महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आणि महिलांच्या संरक्षणासाठी रोहित पवारांना धाराशिवच्या कार्यकर्त्यांनी तलवार भेट दिली. शेतकऱ्याच्या सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर  आहेत. धाराशिव येथे रोहित पवारांच्या मार्गदर्शनाखाली शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक सुरू आहेत.

  • 25 Jun 2026 10:45 AM (IST)

    रविंद्र चव्हाण यांची आणीबाणीवरून काँग्रेसवर टीका

    भाजपचे नेते रविंद्र चव्हाण यांनी आणीबाणीवरून काँग्रेसवर टीका केली आहे.

    २५ जून १९७५ हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक काळा अध्याय म्हणून सर्वांच्या स्मरणात. काँग्रेसच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी लादत संविधानिक मूल्ये, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकांचे मूलभूत हक्क यांची गळचेपी केली.

    अशा कठीण काळात लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी निडरपणे आणीबाणी विरूद्ध लढा दिलेल्या योद्ध्यांना सलाम! आपले योगदान भारत कधीही विसरणार नाही  – असं ट्विट त्यांनी केलं.

  • 25 Jun 2026 10:33 AM (IST)

    विलास घुले हत्या प्रकरणात, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज SIT ने घेतलं ताब्यात

    बीड ब्रेक – बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील तरूण विलास घुले यांच्या हत्या प्रकरणात घटनास्थळावरील दोन ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज एसआयटी ने ताब्यात घेतलं आहे. यामध्ये दगड आणि काचाच्या बाटल्यांनी एकमेकांना मारहाण सुरू असल्याचे दिसत आहे. या दरम्यान मुख्य आरोपी आणि विलास घुले यांच्यात झटापट झाली, आरोपीने थेट विलास घुले यांच्या पोटात चाकू खुपसला आणि तिथून पळ काढल्याचं दिसलं.

  • 25 Jun 2026 10:16 AM (IST)

    आमचा एकही आमदार जाणार नाही – शरद पवार

    आमचा एकसुद्धा  आमदार जाणार नाही, खासदार -आमदार फुटीच्या प्रश्नावरून शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.

  • 25 Jun 2026 10:06 AM (IST)

    देशात लोकशाही राहिली नाही का ? सुप्रिया सुळे यांचा सवाल

    सहकार क्षेत्रात राजकारण आणू नये. देशात लोकशाही राहिली नाही का ? आपली विचारधारा पुढल्या पिढीवर लादली जात्ये – सुप्रिया सुळे यांचा आरोप

  • 25 Jun 2026 09:40 AM (IST)

    सोलापूर महापालिका निवडणुकीच्या खर्चातील बिलात 4 पट वाढ

    स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी त्यावर आक्षेप घेत हे बील थांबवले. प्रशासनाने निवडणूक खर्चासाठी 1 कोटी 71 लाख रुपये मंजूर केले होते. मात्र ठेकेदाराकडून प्रत्यक्षात 6 कोटी 70 लाख 78 हजार बील महापालिकेला देण्यात आलेय. त्यामुळे नियोजित खर्चाच्या 4 पट अधिक बील ठेकेदाराने पाठवल्याने त्याला स्थगिती देण्यात आलीय. हे बील पाहिल्यानंतर नगर अभियंता विभागाने याची फेर पडताळणी केली असता ती रक्कम 4 कोटी 34 लाख 62 हजार इतकी झाली

  • 25 Jun 2026 09:30 AM (IST)

    बाजारपेठ आणि 25 वस्त्यात शिरले मान्सूनच्या पहिल्याच पावसाचे पाणी..

    अमरावती महानगरपालिकेच ढिसाळ नियोजन.. पहिल्याच पावसाने नालीसफाईची पोल खोल. अमरावती जिल्ह्यात काल दहा मंडळात अतिवृष्टी..आजही अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा…अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कॅम्प रोड परिसरातील दुकानात अजूनही पाणीच पाणी.. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील एका कॉम्प्लेक्स मधील दुकानात अद्यापही पावसाचे पाणी…

  • 25 Jun 2026 09:20 AM (IST)

    24 तासांत 189.6 मिलिमीटर पावसाची नोंद

    हतनूर धरणाच्या एकूण 9 केंद्रातील पाणलोट क्षेत्रात 24 तासांत 189.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पाण्याची आवक यामुळे वाढली. एक महिन्यापासून पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक नव्हती…..

  • 25 Jun 2026 09:10 AM (IST)

    खासदार संजय जाधव यांना धक्का, उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

    उद्धव ठाकरे यांचा परभणी दाैरा आहे. खासदार संजय जाधव यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतरहा हा पहिला उद्धव ठाकरे यांचा दाैरा आहे. शिवसेनेचे नेते पक्ष प्रमुख त्यांचं प्रभावती नगरीत स्वागत करणार, असल्याचे मोठे विधान संजय जाधव यांनी केले.

  • 25 Jun 2026 09:05 AM (IST)

    मिरा-भाईंदरमधील आदिवासी जमिनी बळकावल्याचा धक्कादायक प्रकार उघड

    ​भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या कंपनीवर गंभीर ठपका; चौकशी अहवाल महसूल मंत्र्यांकडे सादर. नियम पायदळी तुडवून जमिनींचे बेकायदा हस्तांतरण; मिरा-भाईंदर तहसीलदारांच्या भूमिकेवरही संशयाची सुई. मिरा-भाईंदरमधून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. येथील वरसावे भागातील आदिवासी बांधवांच्या जमिनी बेकायदेशीरपणे लाटल्याचा गंभीर ठपका ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे.

  • 25 Jun 2026 09:00 AM (IST)

    सोलापूर महापालिका निवडणुकीच्या खर्चातील बिलात 4 पट वाढ

    सोलापूर महापालिका निवडणुकीच्या खर्चातील बिलात 4 पट वाढ झाली आहे. स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांनी त्यावर आक्षेप घेत हे बील थांबवले. प्रशासनाने निवडणूक खर्चासाठी 1 कोटी 71 लाख रुपये मंजूर केले होते. मात्र ठेकेदाराकडून प्रत्यक्षात 6 कोटी 70 लाख 78 हजार बील महापालिकेला देण्यात आले. त्यामुळे नियोजित खर्चाच्या 4 पट अधिक बील ठेकेदाराने पाठवल्याने त्याला स्थगिती देण्यात आलीय.

  • 25 Jun 2026 08:55 AM (IST)

    वृद्धाची साडेतीन लाखांची फसवणूक

    जळगावात मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून वृद्धाची साडेतीन लाखांची फसवणूक. फसवणूक करणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील पितापुत्राविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. भारत एकनाथ गायकवाड व त्यांचा मुलगा साहिल भारत गायकवाड या दोघाविरुद्ध गुन्हा दाखल. मुलाला कृषी विभागात नोकरी लावून देतो असे सांगून 66 वर्षीय नामदेव देवराम मोरे यांची फसवणूक झाली आहे.

  • 25 Jun 2026 08:52 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

    अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयासह बाजारपेठ आणि 25 वस्त्यात मान्सूनच्या पहिल्याच पावसाचे पाणी शिरलं आहे. अमरावती महानगरपालिकेचं ढिसाळ नियोजन समोर आलं आहे. पहिल्याच पावसाने नालीसफाईची पोल-खोल केली आहे. अमरावती जिल्ह्यात काल दहा मंडळात अतिवृष्टी झाली. आजही अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कॅम्प रोड परिसरातील दुकानात अजूनही पाणीच पाणी. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील एका कॉम्प्लेक्स मधील दुकानात अद्यापही पावसाचे पाणी.अद्यापही पाण्याचा निचरा झालेला नाही, व्यवसायिकांचे प्रचंड नुकसान.

  • 25 Jun 2026 08:46 AM (IST)

    उद्धव ठाकरे यांच्या परभणी जिल्हा दौऱ्यावर खासदार संजय जाधव यांची प्रतिक्रिया

    उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते पक्ष प्रमुख आहेत. त्यांचं प्रभावती नगरीत स्वागत करणार. त्यांच्या पक्षाची विचारधारा वेगळी, त्यांच्या लोकांना पाठबळ देण्यासाठी त्यांचं येणं सहाजिक आहे. ठाकरे परिवाराविषयी माझी नाराजी नाही असं संजय जाधव म्हणाले. राजीकीय समीकरण बदलली.त्यामुळे इच्छा नसताना मला बदल करून घ्यावा लागला. उद्धव ठाकरे मला समजून घेतील,अशी भावना असल्याचं खासदार संजय जाधव म्हणाले. ठाकरे परिवारावर बोलण्या इतका उंचीचा मी नाही, ज्यांनी मला इथपर्यंत आणण्यासाठी योगदान दिलं, त्यांच्या प्रती आम्ही कृतज्ञ असल्याचं जाधव म्हणाले.

  • 25 Jun 2026 08:35 AM (IST)

    किती रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप होता?

    7.2 आणि 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने सगळ्या वेनेजुएलाला हादरवून सोडलं. राजधानी काराकसमध्ये भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी अनेक इमारती कोसळल्या. भूकंपाचे तीव्र धक्के जाणवताच हजारो लोक लगेच घर आणि कार्यालयाबाहेर पळाले.

  • 25 Jun 2026 08:34 AM (IST)

    वेनेजुएलात शक्तीशाली भूकंप

    वेनेजुएलाला लागोपाठ दोन शक्तीशाली भूकंपांनी हादरवून सोडलय. अनेक इमारती कोसळल्या आहेत. USGS म्हणजे यूनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्वेने या भूकंपात 10 हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला आहे.





  • Source link

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *