Headlines

मुंबईत चाललंय काय? CSMT स्टेशनबाहेर एकाने लोकांवर उगारला धारदार कोयता, प्रवासी भयभीत

मुंबईत चाललंय काय? CSMT स्टेशनबाहेर एकाने लोकांवर उगारला धारदार कोयता, प्रवासी भयभीत
मुंबईत चाललंय काय? CSMT स्टेशनबाहेर एकाने लोकांवर उगारला धारदार कोयता, प्रवासी भयभीत


मुंबईत लोकल ट्रेनमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी चर्चगेट -विरार लोकल ट्रेनमध्ये २२ वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या झाल्याची घटना घडली होती. तर माहिममध्येही स्टेशनबाहेर एकावर चाकू हल्ल्या झाल्याची घडली आहे. त्यानंतर आता नेहमी वर्दळ असलेल्या सीएसएमटी रेल्वे स्टेशन एकाने लोकांवर धारदार कोयता उगारल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. या संपूर्ण घटनेनंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर पोहोचले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सीएसएमटी स्टेशनबाहेर माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाने कोयता उगारल्याची घटना शनिवारी घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. एका व्यक्तीने ‘X’ वर मुंबई पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलीस सतर्क झाले.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक संध्या निकम या त्यांच्या पथकासह तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या. त्यावेळी आरोपी हातात कोयता घेऊन मोठ्याने ओरडत होता. तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडे धावत होता. जणू हा आरोपी त्याच्यासोबत असलेल्या महिलेवर हल्ला करणार होता.

पोलिस पथकाने आरोपी तरुणाला मागून घेरले. त्यानंतर त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी मोठ्या हुशारीने त्याच्या हातातून कोयता हिसकावून घेतला. चौकशीदरम्यान, महिलेने खुलासा केला की आरोपी वकार अन्वर शेख (२२) हा तिचा पती आहे. ते फिरायला आले होते. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर वकारने त्याच्या बॅगेतून कोयता काढून महिलेला आणि आजूबाजूच्या इतरांना धमक्या देण्यास सुरुवात केली.

तत्पूर्वी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ कारवाई करत महिलेची सुखरूप सुटका केली. तसेच आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. अटक केलेल्या आरोपींविरुद्ध अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेत. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *