Headlines

FIFA 2026: राउंड ऑफ 32च्या बाद फेरीसाठी सर्व संघ ठरले, कसे भिडणार? जाणून घ्या वेळापत्रक

FIFA 2026: राउंड ऑफ 32च्या बाद फेरीसाठी सर्व संघ ठरले, कसे भिडणार? जाणून घ्या वेळापत्रक
FIFA 2026: राउंड ऑफ 32च्या बाद फेरीसाठी सर्व संघ ठरले, कसे भिडणार? जाणून घ्या वेळापत्रक


FIFA 2026: राउंड ऑफ 32च्या बाद फेरीसाठी सर्व संघ ठरले, कसे भिडणार? जाणून घ्या वेळापत्रकImage Credit source: fifa world cup twitter

FIFA World Cup 2026, Round of 32 Schedule: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने संपुष्टात आले आहेत. गट फेरीत फ्रान्स, अर्जेंटिना, मेक्सिको यांनी गट फेरीतील सर्व सामने जिंकले. तर गट एच मध्ये धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. या गटातून उरुग्वेचा पत्ता कट झाला. तर स्पेन सोबत विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या केप वर्डे देशाने बाद फेरीत स्थान पक्कं केलं आहे. आता बाद फेरीचा थरार फुटबॉलप्रेमींना अनुभवता येणार आहे. राउंड ऑफ 32 फेरीत 32 संघ पुढच्या फेरीसाठी भिडणार आहे. या फेरीत करो या मरोची लढाई असणार आहे. त्यामुळे या स्पर्धेची उत्सुकता वाढणार आहे. या स्पर्धेत दिग्गज संघांच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. तर दुबळे समजले जाणारे संघ काही चमत्कार करणार का? याबाबतही चर्चा सुरू आहे. या फेरीत विजयी संघ पुढच्या फेरीत म्हणजेच राउंड ऑफ 16 मध्ये खेळणार आहेत. त्यामुळे या फेरीत 16 संघांचं स्वप्नभंग होणार हे निश्चित आहे. चला जाणून घेऊयात राउंड ऑफ 32 मधील संघांचं वेळापत्रक

राउंड ऑफ 32 साठी पात्र ठरलेले संघ

    • गट ए: मेक्सिको, दक्षिण आफ्रिका
    • गट बी: स्वित्झर्लंड, कॅनडा, बोस्निया आणि हर्झेगोविना
    • गट सी: ब्राझील, मोरोक्को
    • गट डी: अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पॅराग्वे
    • गट ई: जर्मनी, आयव्हरी कोस्ट, इक्वेडोर
    • गट एफ: नेदरलँड्स, जपान, स्वीडन
    • गट जी: बेल्जियम, इजिप्त
    • गट एच: स्पेन, केप वर्दे
    • गट आय: फ्रान्स, नॉर्वे, सेनेगल
    • गट जे: अर्जेंटिना, ऑस्ट्रिया, अल्जेरिया
    • गट के: कोलंबिया, पोर्तुगाल, डीआर काँगो
    • गट एल: इंग्लंड, घाना, क्रोएशिया

राउंड ऑफ 32 फेरीचे वेळापत्रक

29 जून (सोमवार):

  • दक्षिण आफ्रिका विरुद्ध कॅनडा (रात्री 12:30 वाजता)
  • ब्राझील विरुद्ध जपान (रात्री 10:30 वाजता)

30 जून (मंगळवार):

  • जर्मनी विरुद्ध पॅराग्वे (बोस्टन, पहाटे 2:00 वाजता)
  • नेदरलँड्स विरुद्ध मोरोक्को (सकाळी 6:30 वाजता)
  • आयव्हरी कोस्ट विरुद्ध नॉर्वे (रात्री 10:30 वाजता)

1 जुलै (बुधवार):

  • फ्रान्स विरुद्ध स्वीडन (पहाटे 2:30 वाजता)
  • मेक्सिको विरुद्ध इक्वेडोर (सकाळी 6:30 वाजता)
  • इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो (रात्री 9:30 वाजता)

2 जुलै (गुरुवार):

  • बेल्जियम विरुद्ध सेनेगल (पहाटे 1:30 वाजता)
  • अमेरिका विरुद्ध बोस्निया आणि हर्झेगोविना (सकाळी 5:30)

3 जुलै (शुक्रवार):

  • स्पेन विरुद्ध ऑस्ट्रिया (रात्री 12:30 वाजता)
  • पोर्तुगाल विरुद्ध क्रोएशिया (सकाळी 4:30 वाजता)
  • स्वित्झर्लंड विरुद्ध अल्जेरिया (सकाळी 8:30 वाजता)
  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध इजिप्त (सकाळी 11:30 वाजता)

4 जुलै (शनिवार):

  • अर्जेंटिना विरुद्ध केप वर्डे (पहाटे 3:30)
  • कोलंबिया विरुद्ध घाना (सकाळी 7:00 वाजता)





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *