
भारतीय चित्रपट संगीताची ओळख संस्कृती, लोकसंगीतातील धून आणि आंतरराष्ट्रीय सुरांचा स्वीकार करणाऱ्या संगीतशैलीसाठी राहिली आहे. राज कपूर यांच्या गाण्यावर रशियन संगीताचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो.
पप्पी लाहिरी यांनी पाश्चात्य संगीत भारतात आणले. 2011 मध्ये एका अशा प्रयोगाने संगीतप्रेमींना थक्क केले, तो म्हणजे दिग्दर्शक आणि संगीतकार विशाल भारद्वाज यांच्या 7 खून माफ या चित्रपटातील “डार्लिंग… आँखों से आँखें चार कर ले”
हे गाणे प्रचंड गाजले. धमाकेदार संगीत आणि आवाज या गाण्यात बघायला मिळाला. उषा उत्थुप आणि रेखा भारद्वाज यांच्या जादुई आवाजांनी सजलेले हे गाणे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले.
मात्र, या गाण्याचा आत्मा भारतीय नसून पूर्णपणे रशियन आहे, आजही भारतीय श्रोत्यांना याची कल्पना नाही. डार्लिंग… आँखों से आँखें चार कर ले या गाण्याची चाल ही रशियातील कालिनका या प्रसिद्ध लोकगीतावर आधारित आहे.
हे गाणे तब्बल 166 वर्षे जुने आहे. हे गाणे रशियन संगीतकार, लेखक इव्हान लारिओनोव्ह यांनी 1860 मध्ये लिहिले व संगीतबद्ध केले होते. प्रसिद्ध गीतकार गुलजार यांनी आपल्या शब्दांनी हे गाणे अधिक खास बनवले.