Headlines

Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा

Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा


राज्यातील राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ आणि ‘ऑपरेशन तुतारी’च्या चर्चांदरम्यान भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)वर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी हा पक्ष नसून एक “टोळी” असल्याचा आरोप करत त्यांनी महायुतीतील नेत्यांना सावध राहण्याचा इशाराही दिला आहे.

माध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, शरद पवार यांची राष्ट्रवादी आता फुटण्याच्या मार्गावर असून, पक्षातील अंतर्गत घडामोडी याची स्पष्ट चिन्हे आहेत. “राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसून एक टोळी होती. आता ती टोळी विखुरायला सुरुवात झाली आहे,” असा दावा त्यांनी केला.

पुढे बोलताना त्यांनी आरोप केला की, या पक्षातील काही नेते पुन्हा सत्तेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत. “अलिबाबाची गुहा पुन्हा मिळते का, या आशेने ते विविध राजकीय हालचाली करत आहेत. येत्या काही दिवसांत या टोळीचे पुढील राजकीय मार्गक्रमण कशा दिशेने होणार आहे, हे राज्यातील जनतेला स्पष्टपणे दिसेल,” असे वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केले.

याचबरोबर महायुतीतील नेत्यांनी अशा राजकीय हालचालींबाबत सतर्क राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडून या टीकेला काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *