Headlines

फ्लिपकार्ट GOAT सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी S26 अल्ट्रा इतक्या कमी किमतीत उपलब्ध, जाणून घ्या ऑफर किंमत

फ्लिपकार्ट GOAT सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी S26 अल्ट्रा इतक्या कमी किमतीत उपलब्ध, जाणून घ्या ऑफर किंमत
फ्लिपकार्ट GOAT सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी S26 अल्ट्रा इतक्या कमी किमतीत उपलब्ध, जाणून घ्या ऑफर किंमत


तुम्ही जर बऱ्याच दिवसांपासून सॅमसंगच प्रीमियम फ्लॅगशिपचा नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी ही संधी खूप खास असु शकते. कारण फ्लिपकार्टच्या GOAT सेल 2026 या सेल दरम्यान सॅमसंग कंपनीने त्याच्या सर्वात पॉवरफूल स्मार्टफोनपैकी एक असलेल्या फ्लॅगशिप मॉडेल सॅमसंग गॅलेक्सी एस26 अल्ट्रावर सवलत म्हणून फोनची किंमत लक्ष्णीयरीत्या कमी केली आहे. लाँच झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच सॅमसंग गॅलेक्सी एस26 अल्ट्रावर तब्बल 21 हजार रूपयांचीमोठी सूट मिळत आहे.

या वर्षी फेब्रुवारीमध्ये 1 लाख् 39 हजार 999 रूपये किमतीत हा फोन लाँच झाला होता. मात्र फ्लिपकार्टच्‍या या सेलमध्ये हा फोन आता 21 हजार रूपये कमी किमतीत उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त तुम्ही बँक ऑफर्सद्वारे अतिरिक्त सवलतींचा लाभ घेऊ शकता. ज्यामुळे त्याची किंमत आणखीन कमी होईल. रंगानुसार हा फोन वेगवेगळ्या किमतींमध्ये उपलब्ध आहे. चला तर मग ऑफर नंतर या फोनची किंमत जाणून घेऊयात.

सॅमसंग गॅलेक्सी एस26 अल्ट्राची किंमत

सॅमसंग गॅलेक्सी एस26 अल्ट्राचा 12 जीबी रॅम आणि 256 जीबी व्हेरिएंट असलेल्या फोनवर फ्लिपकार्ट सेल दरम्यान ग्राहकांना 21 हजार रूपयांची सवलत मिळत आहे, ऑफर नंतर हा फोन आता फ्लिपकार्टवर १ लाख 18 हजार 999 रूपयांना उपलब्ध आहे. ही ऑफर फक्त ब्लॅक, व्हाईट आणि कोबाल्ट व्हायोलेट रंगांवर लागू आहे. स्काय ब्लू व्हेरिएंटची किंमत 1 लाख 24 हजार 999 रूपये इतकी आहे. या किंमत रेंजमध्ये, हा फोन शाओमी १७ अल्ट्रा, विवो एक्स३०० प्रो आणि आयफोन एअर सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करतो.

सॅमसंग गॅलेक्सी एस26 अल्ट्राची वैशिष्ट्ये

स्क्रीन: या फ्लॅगशिप फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि क्वाड एचडी+ रिझोल्यूशन असलेली 6.9-इंचाची डायनॅमिक AMOLED 2X स्क्रीन आहे. या फोनचे स्क्रीन-टू-बॉडी रेशो 90.30 टक्के आहे, त्यामुळे हा फोन HDR10+ ला सपोर्ट करतो आणि त्याची पीक ब्राइटनेस 2600 nits आहे.

चिपसेट: तसेच या फोनमध्ये वेग आणि मल्टीटास्किंगसाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 3 फोर गॅलेक्सी प्रोसेसर वापरण्यात आला आहे.

कॅमेरा: फोनच्या मागील बाजूस 200-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर, सोबतच 10-मेगापिक्सलचा टेलीफोटो सेन्सर, 50 मेगापिक्सलचा 5X पेरिस्कोप लेन्स आणि 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल सेन्सर आहे. पुढील बाजूस 12 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. मागील सॅमसंग नोट सिरीजप्रमाणे हा फोन डेडिकेटेड एस पेन स्टायलसला सपोर्ट करतो.

बॅटरी : या फोनमध्ये 5000 mAh क्षमतेची बॅटरी असून 60W फास्ट चार्जिंगची सुविधा आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *