
पॉडकास्टमध्ये बोलताना राजपाल यादवने या वादाचे स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला होता की, “हा केवळ ५ कोटी रुपयांचा मुद्दा असता तर तो २०१२ मध्येच संपला असता. पण या ५ कोटींमुळे माझे एकूण १७ कोटी रुपये बुडाले. आम्ही मिळून २२ कोटी रुपयांचा एक चित्रपट प्रकल्प सुरू केला होता. त्यात १२ कोटी रुपये खर्च झाले होते आणि ७० टक्के चित्रपट पूर्ण झाला होता. मात्र, समोरच्या पक्षाच्या चुकीच्या हेतुमुळे हा प्रकल्प अर्ध्यावरच थांबला आणि चित्रपट बुडाला.”