Headlines

F-35 देणार पण अमेरिकेची एकच अट, त्यासाठी पाकिस्तानचा मित्र तुर्की रशियासोबत गद्दारी करायला निघालाय

F-35 देणार पण अमेरिकेची एकच अट, त्यासाठी पाकिस्तानचा मित्र तुर्की रशियासोबत गद्दारी करायला निघालाय
F-35 देणार पण अमेरिकेची एकच अट, त्यासाठी पाकिस्तानचा मित्र तुर्की रशियासोबत गद्दारी करायला निघालाय


तुर्कीला पुन्हा एकदा अमेरिकेच्या F-35 फायटर जेट कार्यक्रमात प्रवेश हवा आहे. त्यासाठी त्यांनी रशियाकडून विकत घेतलेली S-400 एअर डिफेन्स सिस्टिम कुठल्या तिसऱ्या देशाला विकण्याची तयारी दाखवली आहे. कारण अमेरिकेने स्पष्ट केलय की, तुर्कीकडे जर S-400 एअर डिफेन्स सिस्टिम असेल तर त्यांना F-35 फायटर जेट्स मिळणार नाहीत. आता प्रश्न हा निर्माण होतो की, या F-35 मध्ये असं काय आहे की,तुर्की रशियाकडून विकत घेतलेली ही सिस्टिम तिसऱ्या देशाला द्यायला तयार आहे. F-35 हे जगातील सर्वात अत्याधुनिक घातक फायटर जेट मानलं जातं. स्टेल्थ टेक्नोलॉजी, स्मार्ट सेंसर आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेयरच्या क्षमतेमुळे हे अन्य फायटर जेट्सपेक्षा वेगळं ठरतं.

तुर्कीने अलीकडेच रशियाला विनंती केलेली की, S-400 एअर डिफेन्स सिस्टिम कुठल्या तिसऱ्या देशात पाठवायची परवानगी द्यावी. राष्ट्रपती रेसेप तैयप एर्दोगन यांनी ही सिस्टिम पुन्हा रशियाकडे सोपवण्याचा प्रस्ताव सुद्धा दिलेला. पण त्यावर पुढे चर्चा झाली नाही. तुर्कीने 2019 साली रशियाकडून S-400 एअर डिफेन्स सिस्टिम विकत घेतली, त्यानंतर अमेरिकेने तुर्कीला F-35 कार्यक्रमातून बाहेर केलं. तुर्कीमधून जो पर्यंत S-400 सिस्टिम हटणार नाही, तो पर्यंत त्यांना पुन्हा F-35 मिळणार नाही, असं अमेरिकेने स्पष्ट केलय.

एकत्र वापरायला विरोध का?

अमेरिकेचं F-35 हे स्टेल्थ टेक्नोलॉजीवर आधारित आहे. S-400 आणि F-35 चा एकत्र वापर केला तर रशियन सिस्टिमला F-35 ची गोपनीय टेक्नोलॉजी आणि या जेटला रडारवर कसं ट्रेस करायचं, त्याची गोपनीय माहिती मिळू शकते. म्हणून अमेरिकेने तुर्कीला सांगितलय की, S-400 सोबत F-35 वापरता येणार नाही. अमेरिका S-400 च्या ऑपरेशनवर लक्ष ठेऊ शकतो, हा तुर्कीचा प्रस्ताव सुद्धा अमेरिकेने फेटाळून लावला.

हवेत उडता सुपर कॉम्प्युटर

F-35 लायटनिंग 2 हे फायटर जेट अमेरिकन कंपनी लॉकहीड मार्टिनने तयार केलं आहे. हे फक्त फायटर जेट नाही, तर तो हवेत उडता सुपर कॉम्प्युटर आहे. स्टेल्थ टेक्नोलॉजी याची सर्वात मोठी शक्ती आहे. त्यामुळे आकाशात हे विमान असताना शत्रुच्या रडारवर ते छोट्या वस्तूसारखं दिसतं. खास डिझाइन आणि रडार शोषून घेणारं वापरलेलं मटेरियल त्यामुळे या विमानाची ओळख लपवता येते. त्यामुळे शत्रुच्या प्रदेशात घुसून खोलवर हल्ला करण्याची या जेटची क्षमता आहे.

F-35 च्या सर्वात खास टेक्नोलॉजीमध्ये सेन्सर फ्यूजन, डिस्ट्रिब्यूटेड एपर्चर सिस्टिम आणि मल्टी फंक्शन एडवांस डाटा लिंक आहे. विमानात लागलेले वेगवेगळे सेन्सर आणि कॅमेरे वेगवेगळी माहिती एकत्र करतात. त्यामुळे पायलट समोर एक स्पष्ट चित्र असतं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *