Headlines

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या होताच…लगेच दबणार ते गुप्त बटण, इराणवर 1000 मिसाईल…अमेरिकेचा धडकी भरवणारा प्लॅन!

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या होताच…लगेच दबणार ते गुप्त बटण, इराणवर 1000 मिसाईल…अमेरिकेचा धडकी भरवणारा प्लॅन!
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या होताच…लगेच दबणार ते गुप्त बटण, इराणवर 1000 मिसाईल…अमेरिकेचा धडकी भरवणारा प्लॅन!


America Iran Clash : अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा एकदा युद्ध सुरू झालं आहे. हे दोन्ही देश एकमेकांवर मोठे हल्ले करण्यासाठी सज्ज आहेत. त्यामुळेच आता पुन्हा एकदा जग इंधन टंचाईच्या खाईत लोटले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे जगाने या युद्धाची धास्ती घेतलेली असताना दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र एक नवी आणि मोठी धमकी इराणला दिली आहे. माझी हत्या झाली तर इराणला नेस्तनाबूत करण्याचा प्लॅनच त्यांनी तयार ठेवला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमका काय दावा केला?

अमेरिका-इराण यांच्यातील तणावाने सध्या वेगळे वळण घेतलेले आहे. मला इराणने मारण्याचा कट रचला किंवा त्यासाठी कोणतेही पाऊल उचलले तर मी माझ्या सैन्याला अगोदरच आदेश देऊन टाकलेले आहेत. माझ्या हत्येचा प्रयत्न केल्यास किंवा माझी हत्या झाल्यास माझे सैनिक विनाशकारी पलटवार करतील, असे ट्रम्प यांनी सांगितले आहे.

1000 क्षेपणास्त्र इराणच्या बाजूनेच….

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्या सोशल मीडिया खात्यावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी याबाबत आणखी सविस्तर माहिती दिली आहे. मला इराणकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. पण आम्ही पूर्णपणे तयार आहोत. आमच्याकडची 1000 क्षेपणास्त्र इराणच्या बाजूनेच रोखलेली आहेत. इराणने मला जीवे मारण्याची हिम्मत जरी केली तर ही सर्व क्षेपणास्त्रे थेट इराणवर डागली जातील, अशी थेट धमकीच डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. याबाबतचे आदेश मी अमेरिकन सैन्याला देऊन ठेवल्याचेही ट्रम्प यांनी आवर्जून सांगितले आहे.

डेड मॅन स्वीचची तरतूद आहे का?

दरम्यान, अमेरिकेतील कायदेतज्ज्ञ आणि संविधान अभ्यासकांच्या मते ट्रम्प यांनी केलेला दावा कायदेशीरदृष्ट्या प्रत्यक्षात उतरवणे शक्य नाही. अमेरिकन कायद्यात कोणत्याही अशा हल्ल्याचे किंवा डेड मॅन स्वीचची कोणतीही तरतूद नाही, असे सांगितले जात आहे.

आम्ही बदला घेणारच

दरम्यान, इराणचे नवे प्रमुख मोजतबा खामेनेई यांनी मात्र आम्ही अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या हत्येचा बदला घेऊ, असं सांगितलेलं आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *