Headlines

Shrirampur Crime Case | आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये मृतदेहासह पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे काल झालेल्या युवकाच्या मृत्यूनंतर वातावरण चांगलेच तापले असून, या प्रकरणी कठोर कारवाईच्या मागणीसाठी नागरिकांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मृत युवकाचा मृतदेह पोलिस ठाण्यात आणण्यात आल्यानंतर आंदोलन अधिक तीव्र झाले.

घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन ममुक्का यांनी पोलिस ठाण्यात भेट देत आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिले.

मात्र, आंदोलकांनी केवळ आश्वासनावर समाधान न मानता आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची ठाम मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

दरम्यान, गेल्या चार तासांपासून पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू असून, या आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांसह स्थानिक आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनीही सहभाग घेतला आहे.

घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिसरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *