
लग्न समारंभात जवळचे कुटुंबीय आणि मित्र उपस्थित होते. यात राज ठाकरे, माजी क्रिकेटपटू इरफान पठाण, आमिरची मुलगी इरा खान, मुलगा जुनैद खान, इराचा पती नुपूर शिखरे, चित्रपटकार आशुतोष गोवारीकर आणि अंबानी कुटुंबातील काही सदस्यांचा समावेश होता. अभिनेत्री एली अवरामसह इतर नातेवाईक आणि मित्रमंडळीही उपस्थित होते. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास जोडप्याने लग्नाची नोंदणी पूर्ण केली.