Headlines

ATS Raid | पाकिस्तानी गँगस्टरशी कनेक्शन? पहाटेपासून ATS ची रेड, मुंबईसह 6 शहरांत छापेमारी

ATS Raid | पाकिस्तानी गँगस्टरशी कनेक्शन? पहाटेपासून ATS ची रेड, मुंबईसह 6 शहरांत छापेमारी
ATS Raid | पाकिस्तानी गँगस्टरशी कनेक्शन? पहाटेपासून ATS ची रेड, मुंबईसह 6 शहरांत छापेमारी


महाराष्ट्रातील गँगस्टर नेटवर्कविरोधात दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई सुरू केली आहे. राज्यभरात सकाळपासून विविध ठिकाणी छापेमारी मोहीम राबवण्यात येत असून, मुंबई, मिरारोड, नालासोपारा, पुणे, नागपूर आणि नाशिक येथे ATS ची पथके सक्रिय झाली आहेत. या कारवाईमुळे राज्यातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या काही गँगस्टर नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या कारवाईचे संबंध पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि डोगर गँगशी जोडले जात असल्याची माहिती समोर येत आहे. ATS कडून संशयितांच्या ठिकाणी झडती घेतली जात आहे.
दरम्यान, या कारवाईबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी, राज्यातील संघटित गुन्हेगारी आणि आंतरराष्ट्रीय गँगस्टर कनेक्शनविरोधात ATS ने मोठे ऑपरेशन सुरू केल्याचे मानले जात आहे. पुढील काही तासांत या कारवाईबाबत अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *