आता हेच राहिलं होतं, इराण-इस्रायल युद्धाचा आणखी एक फटका, तुमच्यावर काय होणार परिणाम?
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या वाढत्या तणावाचे तीव्र पडसाद आता जागतिक बाजारात उमटू लागले आहेत. मध्यपूर्वेतील अस्थिरतेमुळे जागतिक तेल पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे. याचा थेट फटका हवाई क्षेत्राला बसला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात विमान इंधनाचे (ATF) दर प्रति किलोलीटर २.०७ लाख रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले आहेत….