वंदेभारत एक्सप्रेसमधील दह्यात सापडल्या अळ्या, आयआरसीटीसी आणि संबंधित कॅटरर्सवर रेल्वेची कठोर कारवाई
भारतीय रेल्वेने प्रवाशांना आरामदायी सफर घडवण्यासाठी काही वर्षांपूर्वी वंदेभारत एक्सप्रेस सुरु केली. या वंदेभारत एक्सप्रेसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. वंदेभारतचे तिकीट इतर ट्रेनपेक्षा जादा आहे. त्यामुळे या आलिशान वंदेभारत एक्सप्रेसमध्ये चांगल्या दर्जाचे अन्नपदार्थ मिळण्याची अपेक्षा असताना घडताना मात्र विचित्र दिसत आहे. आता वंदेभारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना पुरवण्यात आलेल्या दह्यात अळ्या सापडल्याची घटना उघडकीस आली आहे….