नवलंच! रायगडच्या म्हसळा नगरपंचायतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र, नेमकं काय घडतंय?
म्हसळा नगरपंचायतीतील राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. जानेवारी 2026 मध्ये जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून 7 नगरसेवकांना अपात्र ठरवले होते. हे सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत (शिंदे गट) गेले होते. अपात्र ठरलेल्यांमध्ये नगराध्यक्ष फरहिन अजीज बशरत, कमल रवींद्र जाधव, मेहजबिन नदीन दळवी, असहल असलम कादिरी, सुमैया कॉसम आमदानी, कादीर…