Rohit Pawar on Dadar Kabutar Khana: रोहित पवार तातडीने दादर कबुतरखान्यात जैनधर्मीयांच्या भेटीला, म्हणाले, 'धार्मिक आंदोलनात भावनिक बाजू समजून घेतली पाहिजे'
Dadar Kabutar Khana: मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेने दादरचा कबुतरखाना बंद केल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी जैनधर्मीयांकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. दादर कबुतरखान्याच्या परिसरात झालेल्या आंदोलनात जैन समाजाने रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली होती. तसेच पालिकेने ज्या ताडपत्रीने कबुतरखाना (Kabutar Khana) झाकून ठेवला होता, ती ताडपत्री खेचून फाडण्यात आली. तब्बल तासभर आंदोलन केल्यानंतर धर्मगुरुंच्या आवाहनानंतर हा जमाव…