बापासाठी काय पण… ममता शिवतारे यांनी वडील आमदार विजय शिवतारे यांना किडनी केली दान
मुलगी आणि वडील यांच्यातील नाते हे जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ नाते असते. आपल्या लेकीसाठी बाप आपल्या जीवाचं रान करतो. मुलीवर चांगले संस्कार करतो, तिला चांगले शिक्षण देतो. तिच्या लग्नासाठी आयुष्याची कमाई खर्च करतो. लेकीचा आईपेक्षा बापावर जास्त जीव असतो हे सर्वांनी अनुभवलेले असेल. अशातच आता बापासाठी लेकीने आपली किडनी दान केल्याचे समोर आले आहे….