
आयपीएल 2026 स्पर्धेच्या क्वॉलिफायर 1 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होईल. तर एलिमिनेटर फेरीत सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत होईल. आता या चार संघांपैकी कोणता संघ अंतिम फेरी गाठणार याची उत्सुकता आहे. असं असताना या चारही संघांची प्लेऑफमधील कामगिरी जाणून घेऊयात.. (Photo: IPL/BCCI)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सर्वाधिक म्हणजेच प्लेऑफचे 17 सामने खेळला आहे. त्यात फक्त सात सामन्यात विजय मिळवला आहे. तर 10 सामने गमावले आहेत. त्यामुळे बाद फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कामगिरी हवी तशी नाही. विजयापेक्षा अधिक सामने गमावले आहेत. (Photo: IPL/BCCI)
गुजरात टायटन्सने यंदाच्या पर्वात चांगली कामगिरी केली आहे. क्वॉलिफायर 1 फेरीत आरसीबीशी सामना होणार आहे. असं असताना गुजरात टायटन्स संघ 2022 पासून मैदानात उतरला आहे. तेव्हापासून आतापर्यंत सहा प्लेऑफ सामने खेळले असून, तीन जिंकले आहेत आणि तीन गमावले आहेत. (Photo: IPL/BCCI)
सनरायझर्स हैदराबादने 14 वेळा प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. पण 14 पैकी सहा सामन्यात विजय मिळवण्यात यश आलं आहे. तर 8 सामन्यात पराभव झाला आहे. यंदाही एलिमिनेटर फेरीत राजस्थानशी सामना होणार आहे. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाद होईल. (Photo: IPL/BCCI)
राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत एकूण 11 प्लेऑफ सामने खेळले आहे. यापैकी पाच सामन्यात विजय, तर सहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. यंदाही एलिमिनेटर फेरीत सनरायझर्स हैदराबादचं कडवं आव्हान आहे. या सामन्यात जिंकले तरच क्वॉलिफायर 2 मध्ये खेळण्याची संधी मिळेल. (Photo: IPL/BCCI)