
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ही डोनाल्ड ट्रम्प यांची ओळख आहे. पण त्याआधी ते बिझनेसमॅन म्हणूनही ओळखले जातात. राजकारणात येण्याआधी त्यांनी यशस्वी उद्योजक म्हणूनही नाव कमावलं आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. ट्रम्प यांचं कुटुंब क्रिप्टोकरेंसी मार्केटमध्ये गुंतवणूक करतं. या क्रिप्टोकरेंसी मार्केटमध्ये चढ-उतार येत असतात. यावेळी या चढ-उताराचा जगातील प्रतिष्ठीत आणि राजकीय दृष्टया शक्तीशाली ट्रम्प कुटुंबाला झटका बसला आहे. मिडिया रिपोर्ट्नुसार ट्रम्प यांचा मुलगा एरिक ट्रम्पने अमेरिकन बिटकॉइनवर लावलेला डाव पूर्णपणे उलटा पडला आहे. मुलाच्या चुकीमुळे ट्रम्प यांच्या साम्राज्याला 600 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 5,700 कोटी रुपयांचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. हे सर्व प्रकरण काय आहे, नुकसान कसं झालं ते समजून घ्या.
अमेरिकन बिटकॉइन कॉर्प एका सोप्या कल्पनेने सुरु करण्यात आलेलं. बिटकॉइनची मालकी आणि मायनिंगमधून भरपूर पैसा कमावला जाऊ शकतो. पण या उलट एरिक ट्रम्प याची फसउंडेड कंपनी मोठ्या आर्थिक संकटात अडकली आहे. बिटकॉइन मार्केटमध्ये घसरण झाल्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजेंसची मागणी वेगाने वाढली. अमेरिकन बिटकॉइन आपल्या स्ट्रॅटजीवर कायम राहिली. पण शेअर्समध्ये 95 टक्क्यापेक्षा जास्त घसरण झाली. ब्लूमबर्गच्या आकेडवारीनुसार मागच्या 10 महिन्यात एरिक ट्रम्पच्या कंपनीच्या मार्केट वॅल्यूमध्ये 600 मिलियन डॉलरपेक्षा जास्त म्हणजे 5700 कोटी रुपयांची घसरण झाली आहे. नॅसडॅक मध्ये आपली लिस्टिंग कायम ठेवण्यासाठी कंपनीला एक आठवड्यात 15 वेळा रिवर्स स्टॉक स्प्लिट करावा लागला. बुधवारी या स्टॉकची किंमत आतापर्यंतच्या सर्वात खालच्या पातळीला पोहोचली.
अनेक सामान्य गुंतवणूकदारांचं नुकसान
क्रिप्टो-ओनली कंपन्यांवरुन गुंतवणूकदारांचा विश्वास किती वेगाने उडत चाललाय त्याचे हे संकेत आहेत. कोण जास्त बिटकॉइन कमावणार यावरुन आता यशाच मूल्यमापन होत नाही, तर कोणाकडे वीज, जमीन आणि कंप्यूटिंग इंफ्रास्ट्रक्चरमधून पैसा कमावण्याची क्षमता आहे, त्यावरुन यशाचं मूल्यमापन ठरतं. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या वर्षीच्या फायनान्शियल रिपोर्टमध्ये 1.4 बिलियन डॉलरची क्रिप्टो कमाई दाखवली. पण अनेक सामान्य गुंतवणूकदारांचं नुकसान झालं. ट्रम्प यांच्याशी संबंधित टोकन आणि अमेरिकन बिटकॉइन शेअर्सच्या किंमतींमध्ये घसरण झाली.