LPG Shortage: तेलाचा महिन्यांचा साठा, पण गॅसचा का नाही? LPG-LNG च्या साठ्याची गणितं काय?
भारतात जेव्हा कधी गॅस सिलिंडरची कमतरता किंवा पुरवठ्यात विलंब झाल्याच्या बातम्या येतात, तेव्हा एक सवाल वारंवार उपस्थित होतो. तो म्हणजे जर भारत कच्चे तेल आणि पेट्रोल-डिझेल महिनोंमहिने साठवू शकतो, तर मग गॅसच्या बाबतीत हे का शक्य होऊ शकत नाही? भारत आता जगातील सर्वांत मोठ्या ऊर्जा अर्थव्यवस्थांपैकी एक बनला आहे, त्यामुळे सर्वसामान्य लोकांना हा प्रश्न पडणं…