Headlines

POK Update : पीओकेची जनता रस्त्यावर, हुकूमत गुडघ्यावर! असीम मुनीरला लोळवणार, PAK सैन्यासाठी पुढचे 24 तास खूप महत्वाचे

POK Update : पीओकेची जनता रस्त्यावर, हुकूमत गुडघ्यावर! असीम मुनीरला लोळवणार, PAK सैन्यासाठी पुढचे 24 तास खूप महत्वाचे
POK Update : पीओकेची जनता रस्त्यावर, हुकूमत गुडघ्यावर! असीम मुनीरला लोळवणार, PAK सैन्यासाठी पुढचे 24 तास खूप महत्वाचे


सध्या पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तिथल्या जनतेला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य हवं आहे. म्हणून POK मध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन, विरोध प्रदर्शनं सुरु आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील लोक तिथल्या सरकार विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. पीओकेच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात हिंसाचार, जाळपोळ सुरु आहे. पण पाकिस्तानचा स्वयंघोषित फिल्ड मार्शल आसिम मुनीर आणि शहबाज शरीफ सरकार बंदुकीच्या नळीवर पाकव्याप्त काश्मीरमधील हे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात POK मध्ये अनेक निष्पापांनी आपले प्राण गमावले आहेत. POK मधली परिस्थिती पाकिस्तानी सैन्याच्या नियंत्रणाबाहेर आहे. या दरम्यान पाकिस्तानचा लष्करप्रमुख आसिम मुनीरने पुन्हा एकदा काश्मीरवरून भारतविरोधी सूर आळवला आहे. त्याने काश्मीर पाकिस्तानसाठी जुगुलर वेन म्हणजे सर्वात महत्वाची नस असल्याचं मुनीरने म्हटलय.

रावळपिंडीच्या जीएचक्यूमध्ये आसिम मुनीरच्या अध्यक्षतेखाली पाकिस्तानी सैन्याची 276 व्या कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस झाली. त्यात पाकिस्तानी सैन्याने भारतावर जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकार उल्लंघन आणि डेमोग्राफिक बदलाचे आरोप केले. पाकिस्तानी सैन्याचा मिडिया विभाग आयएसपीआरच्या वक्तव्यानुसार, काश्मीर पाकिस्तानसाठी महत्वाचा मुद्दा आहे. पीओकेमध्ये जॉइंट अवामी कृती समितीने पाकिस्तान आणि पीओके सरकारला 8 जुलै पर्यंतची डेडलाइन दिली आहे. 8 जुलै पर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर पुढच्या रणनितीची घोषणा त्याच दिवशी आंदोलन स्थळावरुन केली जाईल असं समितीने म्हटलं आहे. समितीने आपल्या समर्थकांना शिस्त पाळण्याच आवाहन केलं आहे.

भारतावर काय आरोप केले?

कोर कमांडर्स कॉन्फ्रेंसमध्ये पाकिस्तानी सैन्याने देशाची सुरक्षा स्थिती आणि सैन्य तयारीचा आढावा घेतला. भारत समर्थित दहशतवादी गट अफगाण तालिबानचं नियंत्रण असलेल्या भागातून ऑपरेट करत असल्याचा दावा आयएसपीआरने केला आहे. ते तिथूनच पाकिस्तानवर हल्ले करत असल्याचा आयएसपीआरचा दावा आहे. ऑपरेशन गजब-उल-हक अंतर्गत दहशतवादाविरुद्ध मोहिम सुरु ठेवण्याचा संकल्प पाकिस्तानी सैन्याने केला आहे. त्याशिवाय आयएसपीआरने भारतावर हायब्रिड वॉरफेयर आणि खोटी माहिती पसरवण्याचा आरोप केला. POK च्या निष्पाप जनतेचा आवाज दडपून टाकण्यासाठी पाकिस्तानी लष्कराकडून तिथल्या जनतेवर अत्याचार सुरु आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *