Headlines

Central Contract: पाकिस्तानी खेळाडूंचं वर्षभराच्या पैशांचं गणित सुटलं, पगारात किती वाढ? जाणून घ्या

Central Contract: पाकिस्तानी खेळाडूंचं वर्षभराच्या पैशांचं गणित सुटलं, पगारात किती वाढ? जाणून घ्या
Central Contract: पाकिस्तानी खेळाडूंचं वर्षभराच्या पैशांचं गणित सुटलं, पगारात किती वाढ? जाणून घ्या


Central Contract: पाकिस्तानी खेळाडूंचं वर्षभराच्या पैशांचं गणित सुटलं, पगारात किती वाढ झाली? जाणून घ्याImage Credit source: Getty Images

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नव्या वार्षिक कराराची आखणी केली आहे. यानुसार खेळाडूंचा पगार आणि सामना फी निश्चित करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, खेळाडूंची सामना फी जवळपास दुप्पट करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूला सामना मानधन म्हणून 15 लाख पाकिस्तानी रूपये मिळतील. यापूर्वी वार्षिक करारानुसार ही फी 8 लाख पाकिस्तानी रुपये होती. खेळाडूंसाठी वार्षिक करार निश्चित करण्यासाठी मुख्य प्रशिक्षक माइक हेसन आणि सरफराज खान यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे खेळाडूंना आर्थिक लाभ मिळताना दिसत आहे. रिपोर्टनुसार, पीसीबीच्या वार्षिक करारात असलेल्या ए आणि बी ग्रेड खेळाडूंना सर्वाधिक पैसे मिळणार आहेत. मॅच फी व्यतिरिक्त या खेळाडूंना 5 मिलियन पाकिस्तानी कोट्यवधी रुपयांचा मासिक रिटेनरही मिळेल.

सूत्रांच्या माहितीनुसार, आयसीसी आणि आशिया कप स्पर्धेच्या विजयासाठी बोनसही या वार्षिक करारात सहभागी केला गेला आहे. आयसीसी स्पर्धा जिंकल्यानंतर खेळाडूंना त्या सामना फीच्या 500 टक्के बोनस दिला जाणार आहे. तर आशियाई स्तरावरील स्पर्धा जिंकल्यानंतर 300 टक्के बोनस दिला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. वार्षिक करारात असलेल्या सी कॅटेगरीतील खेळाडूंना जे फक्त टी20 आणि फ्रेंचायझी क्रिकेट खेळतात, त्यांनाही प्रत्येक महिन्याल 1.5 मिलियन पाकिस्तानी रुपये मंथली रिटेनर म्हणून मिळतील. बी कॅटेगरीतील खेळाडूंना हे मानधन 1.8 मिलियन पाकिस्तान रूपयांपर्यंत असेल. पण वार्षिक करारात किती खेळाडू असतील याबाबत पीसीबीने कोणताच खुलासा केलेला नाही.

पाकिस्तानी खेळाडूंना वार्षिक किती मानधन मिळणार?

  • कसोटी खेळाडू : 4.8 कोटी पाकिस्तानी रुपये (1.62 कोटी रुपये)
  • कसोटी आणि वनडे खेळाडू: 6 कोटी पाकिस्तानी रुपये (2 कोटी रुपये)
  • वनडे आणि टी20 खेळाडू: 2.16 कोटी पाकिस्तानी रुपये (73 लाख रुपये)
  • टी20 आणि लीग खेळाडू: 1.18 कोटी पाकिस्तानी रुपये (40 लाख रुपये)

पाकिस्तानी खेळाडूंची सामना फी किती?

  • कसोटी मानधन : 15 लाख पाकिस्तानी रुपये (5 लाख रुपये)
  • वनडे मानधन : 7.5 लाख पाकिस्तानी रुपये (2.54 लाख रुपये)
  • टी20 मानधन : 5 लाख पाकिस्तानी रुपये (1.6 लाख रुपये)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *