Headlines

Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती

Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती


राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना विविध महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले. राज्यातील कायदा-सुव्यवस्था, शेतकरी कर्जमाफी आणि नसरापूर प्रकरणासह दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाबाबतही त्यांनी सभागृहात सविस्तर माहिती दिली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचा दोन स्तरांवर तपास सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी राज्य सीआयडी (CID) आणि विमान अपघात अन्वेषण विभागाकडून (AAIB) सुरू असून, तपास प्रक्रियेबाबत सरकार गंभीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सीबीआय चौकशीची मागणी होत असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, “AAIB चा अंतिम अहवाल अत्यंत महत्त्वाचा आहे. तो प्राप्त झाल्यानंतर पुढील तपासाची दिशा निश्चित होईल. त्यामुळे सध्या CBI चौकशीचा निर्णय घेण्यात आलेला नाही.”

फडणवीस यांनी सांगितले की, तपासादरम्यान वैमानिक सुमित कपूर यांच्याबाबत संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र त्यांच्या बँक खात्यांसह इतर आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात आली असून, त्यामध्ये कोणतीही संशयास्पद बाब आढळून आलेली नाही.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, विमानातील ब्लॅक बॉक्समधील माहिती यशस्वीरित्या रिकव्हर करण्यात आली आहे. प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असला, तरी अंतिम अहवाल येण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. केंद्र सरकारला हा अहवाल शक्य तितक्या लवकर, विशेषतः अजित पवार यांच्या पुण्यतिथीपूर्वी सादर करण्याची विनंती करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

तसेच त्यांनी स्पष्ट केले की, “भावना महत्त्वाच्या असल्या तरी तपास आणि कायदेशीर प्रक्रिया पुराव्यांच्या आधारेच पुढे जावी लागते. AAIB चा अंतिम अहवाल आल्यानंतरच पुढील तपास यंत्रणांना आवश्यक धागेदोरे मिळतील. त्यामुळे कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी अहवालाची प्रतीक्षा करणे आवश्यक आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *