Headlines

Girish Mahajan | तिकीटासाठी नाही; पण दिल्लीला जातोय! गिरीश महाजनांचा अप्रत्यक्ष टोला नक्की कोणाला?

Girish Mahajan | तिकीटासाठी नाही; पण दिल्लीला जातोय! गिरीश महाजनांचा अप्रत्यक्ष टोला नक्की कोणाला?
Girish Mahajan | तिकीटासाठी नाही; पण दिल्लीला जातोय! गिरीश महाजनांचा अप्रत्यक्ष टोला नक्की कोणाला?


राज्यात विधान परिषदेच्या जागावाटपावरून राजकीय हालचालींना वेग आला असून महायुतीतील नेत्यांचे दिल्ली दौरे चर्चेचा विषय ठरत आहेत. मंत्री गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्ली दौऱ्यावर असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. विधान परिषदेच्या जागावाटपाबाबत महत्त्वाच्या चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, गिरीश महाजन यांनी आपल्या दिल्ली दौऱ्याबाबत स्पष्टीकरण देताना, “माझा दौरा धनगर आरक्षणासंदर्भात आहे,” असं सांगितलं. मात्र त्याचवेळी त्यांनी अप्रत्यक्ष टोला लगावत राजकीय चर्चांना आणखी हवा दिली.
महाजन म्हणाले, “मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या चिरंजीव प्रताप पाटील यांच्यासाठी दिल्लीला जाऊन जागेची मागणी केली आहे. त्यामुळे मीही तातडीने दिल्लीला निघालो आहे, हे आपल्या माहितीसाठी सांगतो.” मात्र, “मी तिकीटासाठी जात नाही,” असं स्पष्ट करत त्यांनी नाव न घेता टोला लगावला. विधान परिषदेच्या 17 जागांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपासाठी जोरदार हालचाली सुरू असून, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समन्वय साधण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *