Headlines

GK: पेट्रोलमध्ये थेट इथेनॉल टाकलं जातं की काही प्रक्रिया असते, जाणून घ्या ब्लेंडिंगबाबत..

GK: पेट्रोलमध्ये थेट इथेनॉल टाकलं जातं की काही प्रक्रिया असते, जाणून घ्या ब्लेंडिंगबाबत..
GK: पेट्रोलमध्ये थेट इथेनॉल टाकलं जातं की काही प्रक्रिया असते, जाणून घ्या ब्लेंडिंगबाबत..


GK: पेट्रोलमध्ये थेट इथेनॉल टाकलं जातं की काही प्रक्रिया असते, जाणून घ्या ब्लेंडिंगबाबत..Image Credit source: money9live

अमेरिका, इस्राईल आणि इराक युद्धामुळे महागाईचा भडका उडाला आहे. जगामध्ये इंधनाचे दर वाढले आहेत. असं असताना पेट्रोलला पर्याय म्हणून इथेनॉलकडे पाहिलं जात आहे. 100 टक्के इथेनॉलवर धावतील अशा गाड्या तयार केल्या जात आहेत. तसेच भार कमी करण्यासाठी आयात केलेल्या पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रित करून ते दिलं जात आहे. इथेनॉल मिसळण्याच्या प्रमाणावर E10 किंवा E20 पेट्रोल सध्या पंपावर मिळत आहे. म्हणजेच तुमच्या गाडीत टाकलं जाणाऱ्या पेट्रोलमध्ये त्या टक्केवारीनुसार इथेनॉल आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? पेट्रोलमध्ये इथेनॉल कसं मिसळलं जातं ते.. पंपावरील पेट्रोलच्या टाकीत थेट इथेनॉल टाकलं जातं का? की त्यासाठी काही वेगळी प्रक्रिया आहे. असे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर त्याचं उत्तर पुढे जाणून घेऊयात.

इथेनॉल काय असतं? पेट्रोलमध्ये टाकण्याची गरज काय?

इथेनॉल हे एक प्रकारचं अल्कोहल आहे. उसाचं रस, मका, खराब झालेले तांदुळ आणि अन्नधान्य सडवून ते तयार केलं जातं. भारत सरकार पेट्रोलसाठी पूर्णपणे इतर देशांवर अवलंबित आहे. त्यामुळे विदेशातून महागडं कच्चं तेल खरेदी करण्याऐवजी आणि त्यांच्यावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इथेनॉल पर्यायाकडे पाहिलं जात आहे. त्यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंडिंग वेगाने केलं जात आहे. इथेनॉल कृषी उत्पादनातून तयार केलं जातं. त्यामुळे त्याच्याकडे एक स्वदेशी आणि हरीत इंधन म्हणून पाहिलं जातं.

इथेनॉल कसं मिसळलं केलं जातं?

पेट्रोल पंपावर भूमिगत इंधन टाक्या असतात. त्यात थेट इथेनॉल टाकलं जातं, असं तुम्हाला वाटत असेल तर ते अजिबात नाही. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याची पूर्ण प्रक्रिया पेट्रोल पंपापासून दूर ऑइल मार्केटिंग कंपन्या मोठमोठ्या फ्यूल टर्मिनल्स किंवा मेन डेपोत करतात. सर्वात प्रथम इथेनॉल सुरक्षितपणे मोठ्या टँकरच्या माध्यमातून डेपोवर आणलं जातं. पेट्रोल आणि इथेनॉल वेगवेगळ्या टँकरच्या माध्यमातून डेपोवर दाखल होतं. त्यानंतर या दोन्ही गोष्टी अत्याधुनिक पद्धतीने प्रक्रिया करून म्हणजेच इन लाइन ब्लेंडिंगच्या माध्यमातून मिसळल्या जातात. या प्रक्रियेला स्प्लॅश ब्लेंडिंग असंही म्हंटलं जातं. टँकरमध्ये भरताना पाइपला लागून असलेल्या संगणकीकृत ब्लेंडिंग आर्म्सच्या माध्यमातून निश्चित दबावात पेट्रोलसोबत इथेनॉल इंजेक्ट केलं जातं.

E20 पेट्रोल असल्याचं कसं निश्चित होतं?

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचं काम स्वयंचलित प्रवाहमापक आणि संगणक प्रणालीद्वारे नियंत्रित केलं जातं. आधुनिक यंत्राच्या द्वारे पेट्रोलचा प्रवाह दर मोजला जातो आणि अचूक मिश्रण करण्यासाठी इथेनॉलचं प्रमाण ठरवलं जातं. ई20 इंधन तयार करण्यासाठी संगणाकाद्वारे 80 टक्के शुद्ध पेट्रोल आणि 20 टक्के इथेनॉल प्रमाण निश्चित केलं जातं. स्वयंचलित यंत्रणेमुळे पेट्रोल आणि इथेनॉल मिश्रणात कुठेही तफावत होत नाही. त्यामुळे त्याचं प्रमाण योग्य राहतं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *