
मुंबईतील ऐतिहासिक केईएम (KEM) रुग्णालयाचे नाव बदलून ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ करण्याची मागणी बर्याच काळापासून केली जात होती. या रुग्णालयाचे नाव किंग एडवर्ड मेमोरियल असल्यामुळे अनेकांनी आक्षेप दर्शवला होता. मंगल प्रभात लोढा यांनी या संदर्भातील प्रस्ताव आरोग्य समितीला पाठवला होता.
नावात बदल करण्याचा प्रस्ताव आरोग्य समितीने मंजूर केला असून, तो आता पालिका प्रशासनाकडे पाठवला आहे. या वेळी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, ‘समितीने जो निर्णय घेतला आहे तो कायम राहील’.
अश्विनी भिडे यांच्या प्रतिक्रियेवरुन केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील दाखवला जाण्याची शक्यता दाट झाली आहे.