Headlines

Laxman Hake Press | ओबीसींच्या अन्नात माती कालवली! लक्ष्मण हाके आक्रमक; फडणवीस, जरांगे यांच्यावर हल्लाबोल!

Laxman Hake Press | ओबीसींच्या अन्नात माती कालवली! लक्ष्मण हाके आक्रमक; फडणवीस, जरांगे यांच्यावर हल्लाबोल!
Laxman Hake Press | ओबीसींच्या अन्नात माती कालवली! लक्ष्मण हाके आक्रमक; फडणवीस, जरांगे यांच्यावर हल्लाबोल!


सोलापुरात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकार, मनोज जरांगे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर जोरदार निशाणा साधत ओबीसी आरक्षण आणि निधी वाटपाच्या मुद्द्यावरून तीव्र टीका केली. “महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर एकाही ओबीसीचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. सरकारने ओबीसींच्या अन्नात माती कालवण्याचं काम केलं आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरही टीका केली. “सरकार मनोज जरांगेंसारख्या व्यक्तीच्या मागण्या पूर्ण करत आहे, पण ओबीसी समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जात आहे,” असं ते म्हणाले.यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही थेट हल्लाबोल केला. “ओबीसी समाजाला बजेटमध्ये ५० टक्के निधी मिळायला हवा होता, मात्र सरकारने १ टक्क्यापेक्षाही कमी निधी दिला,” असा आरोप त्यांनी केला. तसेच विविध महामंडळांची घोषणा करूनही त्यांना निधी आणि प्रशासनिक व्यवस्था उपलब्ध नसल्याचं त्यांनी सांगितलं.
भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना हाके यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली. “लाड यांनी आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग बोलावं,” असं म्हणत त्यांनी सरकारवर “सेल्फ गोल” केल्याचा आरोप केला. दरम्यान, मराठा आरक्षण, जातनिहाय जनगणना आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवरही लक्ष्मण हाके यांनी सरकारवर प्रश्न उपस्थित करत आगामी काळात आणखी मोठे खुलासे करण्याचा इशारा दिला.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *