Headlines

Maharashtra News LIVE : विजय जिंकले, तामिळनाडू विधानसभेत बहुमत सिद्ध

Maharashtra News LIVE : विजय जिंकले, तामिळनाडू विधानसभेत बहुमत सिद्ध
Maharashtra News LIVE : विजय जिंकले, तामिळनाडू विधानसभेत बहुमत सिद्ध


  • 13 May 2026 02:00 PM (IST)

    वर्षेभर सोने खरेदी करू नका हे मोदींचे आवाहन चुकीचं-ग्राहक

    देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील वर्षभर सोने खरेदी करू नका असे आवाहन देशवासीयांना केलं आहे. मात्र भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याला असाधारण महत्त्व आहे. सण उत्सवाच्या निमित्ताने सोने खरेदी केलं जातं. मग आता उत्सवासाठी सोने खरेदी करायचं नाही का? असं मत ग्राहक व्यक्त करत आहेत.

  • 13 May 2026 01:45 PM (IST)

    भोंदू अशोक खरातला 5 दिवसांची पोलिस कोठडी

    नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणात सध्या चौकशी सुरु असून अशोक खरातला कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने अशोक खरातला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

  • 13 May 2026 01:30 PM (IST)

    बीडमधील घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत

    बीडमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. महिनाभरापूर्वी ऑनलाइन बुकिंग करून देखील गॅस सिलेंडर मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी गॅस सिलेंडर रस्त्यावर आणून आपला रोष व्यक्त केला.

  • 13 May 2026 12:52 PM (IST)

    बीडमध्ये पंडित-क्षीरसागर यांच्यामध्ये संघर्ष

    बीडमध्ये पंडित-क्षीरसागर यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. आमदार विजयसिंह पंडित यांनी घेतलेल्या बैठकीनंतर आमदार संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन आपल्या मतदारसंघातील कामासंदर्भात होत असलेल्या बैठकीचे मला निमंत्रण नाही याबद्दल मी हक्क भंग दाखल करू शकतो असे नमूद केले. यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

  • 13 May 2026 12:36 PM (IST)

    नरेंद्र मोदी यांचं आवाहन गांभीर्याने घेणं गरजेच – एकनाथ शिंदे

    “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं ते आपण देखील गांभीर्याने घेणं आवश्यक आहे. पेट्रोल-डिझेलचा वापर कमी झाला पाहिजे. मी स्वतः इलेक्ट्रिक व्हेईकल गाडी वापरत आहे. ताफ्यामधल्या मधल्या गाड्या कमी केल्या आहेत. इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर मी सुरु केला आहे. इतर मंत्र्यांना देखील मी सांगितले आहे” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

  • 13 May 2026 12:16 PM (IST)

    गाडीला कट मारल्याच्या वादातून गोळीबार

    गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे गाडीला कट मारल्याच्या वादातून एका बीएसएफ जवानाने एका व्यक्तीवर गोळीबार केल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. भूषण दिसले असे बीएसएफ जवानाचे नाव असून तो मूळचा नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील रहिवासी आहे.

  • 13 May 2026 12:06 PM (IST)

    विजय जिंकले, तामिळनाडू विधानसभेत बहुमत सिद्ध

    मुख्यमंत्री बनल्यानंतर थलपती विजय यांनी तामिळनाडू विधानसभेत आज बहुमत सिद्ध केलं. विजय यांच्या सरकारला 144 आमदारांचं समर्थन मिळालं. बहुमतापेक्षा कितीतरी जास्त आमदार त्यांच्याकडे आहेत. बहुमतासाठी 118 चा आकडा होता.

  • 13 May 2026 11:59 AM (IST)

    जळगावच्या एटीएस पथकाने वाकोद गावातील एकाला चौकशीसाठी घेतलं ताब्यात

    जळगावच्या एटीएस पथकाने जामनेर तालुक्यातील वाकोद गावातील एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीच्या फोनवरून संशयास्पद कॉल झाल्याची सूत्रांची माहिती आहे. संबंधित व्यक्तीला एटीएसच्या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं कळतंय. संबंधित व्यक्तीने नेमका कॉल कोणाला केला होता, त्याच्या मोबाईलवरून कोणाला संपर्क साधण्यात आला, याची माहिती चौकशीनंतरच समोर येईल.

  • 13 May 2026 11:50 AM (IST)

    सोने-चांदीचे दर वाढले; सोनं प्रतितोळा 9 हजार रुपयांनी वाढलं

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोनं खरेदी करू नका, या आवाहनानंतर सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याचे दर 161,850 रुपये प्रतितोळा झाले असून 22 कॅरेट सोन्याचे दर 1,49,50  प्रतितोळा झालं आहे. तर चांदी प्रतिकिलो 2,90,000 रुपयांवर पोहोचलं आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळा नऊ हजारांची तर चांदीच्या दरात प्रती किलो बारा हजार रुपयांची वाढ झाली आहे.

  • 13 May 2026 11:40 AM (IST)

    सोलापूर जिल्ह्यात उष्माघातामुळे शेतकरी महिलेचा मृत्यू

    सोलापूर जिल्ह्यात उष्माघातामुळे शेतकरी महिलेचा मृत्यू झाला आहे. मोहोळ तालुक्यातील पापरी गावच्या 35 वर्षीय शेतकरी महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती आहे. शोभा डोंगरे असं उष्माघाताने मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. नेहमीप्रमाणे आपल्याला शेतात काम करण्यासाठी गेल्यानंतर अचानक शोभा डोंगरे यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

  • 13 May 2026 11:31 AM (IST)

    पाकिस्तानी गॅंगस्टर शहजाद भट्टी गँगच्या संबंधित लोकांचं ATS कडून सर्च ऑपरेशन सुरू

    पाकिस्तानी गॅंगस्टर शहजाद भट्टी गँगच्या संबंधित लोकांचं ATS कडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. नाशिकमध्ये देखील ATS पथकाकडून जुने नाशिक परिसरात सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानी भट्टी गँगचे संबंधित नाशिकमध्ये असल्याची ATS ला माहिती मिळाली. ATS कडून जुने नाशिक परिसरामध्ये असलेल्या काही भागात संशयित वास्तव्यास असल्याची माहिती आहे. नाशिक एटीएस पथक कारवाई करत असून काही संशयिताना चौकशीसाठी ताब्यात घेतलं जाणार आहे.

  • 13 May 2026 11:20 AM (IST)

    मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर चालल्यावर जलील-शिरसाटांमध्ये जुंपली

    मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर चालल्यावर जलील-शिरसाटांमध्ये जुंपली आहे. शिरसाटांकडून जलील यांचा निजामाची औलाद आणि राक्षस असा उल्लेख करण्यात आला. विष पेरणाऱ्या जलील यांना सोडणार नाही, असं शिरसाट म्हणाले. इतकंच नव्हे तर निदा खानला लपवण्यामागे जलील यांचा हात होता, असा आरोपही त्यांनी केला आहे.

  • 13 May 2026 11:10 AM (IST)

    नीट पेपरफुटी प्रकरणी अटक केलेल्या शुभम खैरनारच्या घरी नाशिक पोलीस दाखल

    नाशिक – नीट पेपरफुटी प्रकरणी अटक केलेल्या शुभम खैरनारच्या घरी नाशिक पोलीस दाखल झाले आहेत. पेपर फुटीच्या प्रकरणानंतर प्राथमिक चौकशीसाठी वास्तव्यास असलेल्या अपार्टमेंटमध्ये पोलीस दाखल झाले आहेत. काल शुभम खैरनार याचा ताबा सीबीआयला दिल्यानंतर प्राथमिक चौकशीसाठी नाशिक पोलीस शुभम खैरनारच्या घरी दाखल झाले आहेत.

  • 13 May 2026 11:00 AM (IST)

    मोदींच्या आवाहनानंतर एकनाथ शिंदेंचा गो ग्रीनचा नारा; इलेक्ट्रीक कारच्या वापरावर भर

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल, तेल कमी वापरण्याचं आवाहन केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडवर आहेत. एकनाथ शिंदे यांनी आजपासून गो ग्रीनचा नारा दिला आहे. शिंदे स्वत: आजपासून इव्ही कार वापरणार आहेत. सर्व मंत्री आणि आमदार यांनीही इव्ही कारचा वापर करावा, अशा सूचना एकनाथ शिंदे सर्व नेत्यांना देणार आहेत.

  • 13 May 2026 10:45 AM (IST)

    पोलिओ डोसनंतर अडीच महिन्यांच्या चिमुकलीचा अचानक मृत्यू

    पोलिओ डोसनंतर अडीच महिन्यांच्या चिमुकलीचा अचानक मृत्यू झाला. आजोबांनी नातीचा मृतदेह मांडीवर ठेवून शवविच्छेदन खोलीच्या बाहेर बसून  रात्र काढली. जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अमानवीय प्रकाराने संतापाची लाट उसळली आहे. चाळीसगाव तालुक्यातील टहाकळी प्रचा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पोलिओ डोस आणि लस दिल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत सचिता दीपक बोरसे या अडीच महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू झाला. “किमान शव पेटीत तरी मृतदेह ठेवायला हवा होता” म्हणत नातेवाईकांचा संताप; चौकशी आणि कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

  • 13 May 2026 10:35 AM (IST)

    सोलापूर शहरात सकाळपासून सूर्यदर्शन न झाल्याने सोलापूरकर सुखावले

    मागील दीड महिन्यापासून 42 ते 43 डिग्री सेल्सीयस तापमानामुळे सोलापूरकर हैराण झाले होते. मात्र आज साकळपासून सूर्यदर्शन न झाल्याने सोलापूरतर सुखावलेत. जिल्ह्यात यंदाच्या वर्षी उच्चांकी तापमानामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागतेय, त्यातच आज सुर्यदर्शन न झाल्याने नागरिक काहीकाळ सुखावले आहेत.

  • 13 May 2026 10:20 AM (IST)

    ज्यातील विविध महामंडळांच्या अध्यक्ष व सदस्य नियुक्त्यांबाबत महायुतीत वेगाने चर्चा सुरू

    लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षासाठी काम केलेल्या नेत्यांना संधी देण्याबाबत वरिष्ठ स्तरावर मंथन सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून इच्छुकांची यादी तयार करण्यात येत असून, लवकरच पहिल्या टप्प्यात काही महामंडळांच्या नियुक्त्या जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रादेशिक आणि सामाजिक समतोल राखत नियुक्त्या करण्यावर भर दिला जाणार आहे. इच्छुक नेत्यांची मुंबईत पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी गर्दी होत असल्याची माहीती आहे.

  • 13 May 2026 10:08 AM (IST)

    मोटेवाडी दुर्घटनेतील मृतांना प्रत्येकी चार लाख मदतीची पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा

    सांगलीच्या जत तालुक्यातील मोटेवाडी येथे वादळी वाऱ्याने भिंत पडून मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. मोटेवाडी येथे मंगळवारी मरगुबाई देवीच्या यात्रे दरम्यान वादळी वाऱ्याने चिरा-विटांची भिंत कोसळून सहा भाविकांचा मृत्यू झाला होता, तर 12 जण जखमी झाले होते, यातील जखमींची पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून नदीच्या शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेण्यात आली आहे यावेळी नातेवाईकांशी जखमींशी संवाद साधत मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिला आहे तसेच या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून जखमींच्यावरील उपचाराचा खर्च देखील शासनाकडून करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

  • 13 May 2026 09:57 AM (IST)

    नीट पेपर फुटीचे लातूर कनेक्शन? ४२ प्रश्न मॅच झाल्याचा दावा; पोलीस तपासाला वेग

    नीट (NEET) परीक्षा पेपर फुटीच्या संशयावरून लातूर पोलिसांनी आता सखोल तपास सुरू केला असून, तक्रार असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. एका पालकाने दिलेल्या संशयास्पद तक्रारीनंतर लातूरमधील एका खासगी क्लास संचालकाची चौकशी करण्यात येत आहे. संबंधित संचालकाने परीक्षेपूर्वी घेतलेल्या ‘मॉक टेस्ट’मधील तब्बल ४२ प्रश्न प्रत्यक्ष नीट परीक्षेत जसेच्या तसे आल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, पेपर फुटीचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचले आहेत का, यादृष्टीने पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरवली आहेत.

  • 13 May 2026 09:47 AM (IST)

    बदलापुरात बेकायदेशीर मासळी विक्रेत्यांविरोधात कारवाईचा इशारा; माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे आक्रमक

    बदलापूर शहरात रस्त्यावर बसणाऱ्या बेकायदेशीर मच्छी विक्रेत्यांमुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असून, यामुळे ‘स्वच्छ बदलापूर’ मोहिमेला मोठा अडथळा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला कारवाईचा इशारा दिला आहे. रस्त्यावर अनधिकृतपणे मासळी विक्री करणाऱ्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून, विक्रेत्यांनी केवळ पालिकेने निश्चित केलेल्या जागेवरच बसून व्यवसाय करावा, असे आवाहन घोरपडे यांनी केले आहे. अन्यथा, शहराच्या स्वच्छतेसाठी आणि शिस्तीसाठी अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

  • 13 May 2026 09:37 AM (IST)

    बारामतीत शिकाऊ विमानाचा अपघात; पायलट सुरक्षित

    बारामतीमध्ये पुन्हा एकदा शिकाऊ विमान कोसळल्याची घटना घडली आहे. सरावा दरम्यान हे विमान कोसळले असून, सुदैवाने या अपघातात शिकाऊ पायलट सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

  • 13 May 2026 09:27 AM (IST)

    भोंदू अशोक खरातला आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सिन्नर न्यायालयात हजर करणार

    नाशिकमधील भोंदूगिरी प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या अशोक खरातचा ताबा आता सिन्नर पोलिसांनी घेतला असून, आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. सिन्नरच्या जगदंबा पतसंस्थेमध्ये बनावट खाती उघडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका खरातवर ठेवण्यात आला आहे. न्यायालयाने तपासासाठी मंजुरी दिल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा त्याला ताब्यात घेतले. भोंदूगिरीच्या गुन्ह्यांनंतर आता बनावट खात्यांच्या माध्यमातून केलेल्या या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी खरातच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

  • 13 May 2026 09:07 AM (IST)

    चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने बस पलटी; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

    मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिकहून मालेगावाकडे जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला असून, यामध्ये ४ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बस चालवत असताना चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. ज्यामुळे वेगावरील नियंत्रण सुटून बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन पलटी झाली. या अपघातात बसमधील ४ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना तातडीने मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, बस चालकाला गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

  • 13 May 2026 08:50 AM (IST)

    जळगाव जिल्ह्यात ४ गावांना होतोय ७ टँकरद्वारे पाणीपुरवठा

    पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील ३९ गावांमध्ये ४० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. वाढत्या तापमानामुळे अनेक गावांतील पारंपरिक जलस्रोत कोरडे पडू लागल्याने पाणीटंचाई. अमळनेर तालुक्यात सर्वाधिक ६ टँकर कार्यरत असून, भुसावळ तालुका येथे १ टँकर सुरू करण्यात आला आहे. मुक्ताईनगर तालुका येथे सर्वाधिक ९ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या असून अमळनेर तालुका येथे १३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले

  • 13 May 2026 08:40 AM (IST)

    एमडी ड्रग्जविरोधात सोलापूर शहर पोलिसांची कारवाई

    तब्बल 1 कोटी 90 लाख रुपयांचे 950 ग्रॅम एमडी ड्रग पोलिसांकडून जप्त. सोलापूर शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेची एमडी ड्रग्ज विरोधात कारवाई. सदर एमडी ड्रग बाळगल्या प्रकरणी रिजवान खान, साहिल पिरजादे या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. एमडी ड्रग्जच्या संदर्भात आरोपींचे मुंबई कनेक्शन असण्याचा पोलिसांना दाट संशय. सदर प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली

  • 13 May 2026 08:35 AM (IST)

    पदनियुक्ती घेतलेल्या नऊ वैद्यकीय अधिकाऱ्यांना राज्य आरोग्य विभागाचा दणका

    धाराशिव आरोग्य विभागात मोठी खळबळ,९ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पूर्व पदावर येण्याच्या आरोग्य विभागाच्या कडक सूचना, येत्या ३० जूनपर्यंत पदमुक्तीचे दिले आदेश. धाराशिव जिल्ह्यातील 9 डॉक्टरांवर आरोग्य विभागाची मोठी प्रशासकीय कारवाई. तत्कालीन आरोग्य मंत्री यांच्याशी संपर्कात असलेल्या अधिकाऱ्यांनाच संवर्ग बदलून नियुक्त्या दिल्याची सूत्रांची माहिती.

  • 13 May 2026 08:30 AM (IST)

    नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल

    बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांना त्यांच्या दालनात घुसून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मालमत्तेच्या पीटीआर (PTR) नोंदीतील त्रुटीवरून झालेल्या वादातून शेख निजाम आणि त्यांच्या मुलाने हा प्रकार केला. यावेळी आरोपींनी शासकीय कामात अडथळा आणून कार्यालयातील खुर्ची उचलून आपटली आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली असा फिर्यादीत आरोप आहे. या घटनेप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात शेख निजाम आणि त्याच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.

  • 13 May 2026 08:20 AM (IST)

    कसारा-आसनगाव लोकल दोन तास बंद

    कसारा विभागात ‘ओव्हरहेड इक्विपमेंट’ संबंधी अडथळे दूर ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित करण्याच्या पूर्वतयारीसाठी विशेष करण्यात आला आहे. आज, १३ मे रोजी दुपारी आणि १४ ते १६ मे दरम्यान रात्रकालीन ब्लॉक असणार आहे. ब्लॉकवेळेत कसारा ते आसनगाव या दरम्यान लोकल बंद राहणार आहेत.

  • 13 May 2026 08:14 AM (IST)

    मालेगावचे तापमान 43.8 अंश सेल्सिअस वर.

    मार्च, एप्रिल आता मे महिना ही मालेगावकरांसाठी सर्वाधिक हॉट ठरला आहे. पारा सातत्याने 40 अंशाचा पार आहे. मागील सहा दिवसापासून पारा पुन्हा 43 अंशावर आला आहे. वाढत्या उन्हाने मालेगावकर हैराण झाले असून रस्तेही शुकशुकाट झाले आहेत.

  • 13 May 2026 08:13 AM (IST)

    केंद्र सरकारचा सोन्याच्या आयात शुल्काबाबत मोठा आदेश…

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनानंतर त्यांनी थेट आता सोन्याच्या आयातीवरील शुल्कात मोठी वाढ केली. 6 टक्क्याहून 15 टक्के हे शुल्क वाढण्यात आले.



  • Source link

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *