Headlines

Mumbai | हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका.. मुंबईतील कंपनीमधील धक्कादायक प्रकार उघड

नाशिक आयटी कंपनीनंतर मुंबईतही कॉर्पोरेट जिहाद घडतंय का, असा प्रश्न समोर आला आहे. आग्रीपाडा परिसरात 2024 पासून सुरू असलेल्या कथित छळप्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या 19 वर्षीय तरुणीला सहकर्मी अश्रफ शेख याने अश्लील मेसेज, फोटो आणि व्हिडिओ पाठवून त्रास दिल्याची तक्रार समोर आली आहे. यानंतर पीडितेने स्वतः माध्यमांसमोर येऊन आरोपीच्या कारनाम्याबाबत सांगितले.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने मैत्रीच्या नावाखाली जवळीक वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लॉजवर भेटून शारीरिक संबंध ठेवण्याचा दबाव टाकल्याचा आरोप आहे. तसेच तिच्याकडून वैयक्तिक फोटो मागून मानसिक छळही करण्यात आल्याचे सांगितले जाते. इतकेच नाही, तर मुलीला फसवण्यासाठी त्याने सांगितले की, ‘हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात. माझ्या काकांनी तीन लग्न केले, त्यापैकी एक हिंदू आहे. तिला आम्ही सगळी सूट देतो. तू माझ्याशी शारीरिक संबंध ठेवलेस, तर पुढे तुलाही पूजाअर्चा करण्याची सूट असेलच.’

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *