Headlines

NEET Paper Leak 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणातील आजवरचा सर्वात मोठा खुलासा, गेस पेपरच्या नावाखाली चक्क असली…

NEET Paper Leak 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणातील आजवरचा सर्वात मोठा खुलासा, गेस पेपरच्या नावाखाली चक्क असली…
NEET Paper Leak 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणातील आजवरचा सर्वात मोठा खुलासा, गेस पेपरच्या नावाखाली चक्क असली…


सध्या देशात नीट पेपरफुटी प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणाचे धागेदोरे नाशिकमध्ये सापडल्यानंतर लातूर आणि नांदेडमध्ये चौकशी करण्यात आली. लातूर येथील प्रसिद्ध ‘रेणुकाई करिअर सेंटर’ (RCC)चे संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर (वय ४७) यांना नीट युजी (NEET UG) पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) पुण्यातून अटक केली आहे. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

नीट (NEET) पेपर लीक प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक आणि मोठा खुलासा समोर आला आहे. परीक्षेत संभाव्य प्रश्न येतील या नावाखाली (गेस पेपर म्हणून) विद्यार्थ्यांना थेट मूळ प्रश्नपत्रिकाच पोहोचवण्यात आली होती. यासाठी तब्बल ६० पानांची एक पीडीएफ (PDF) फाईल विद्यार्थ्यांपर्यंत पाठवण्यात आली होती. हा संपूर्ण गेस पेपर हाताने लिहिलेला (Handwritten) होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, याच फाईलमधील तब्बल १३५ प्रश्न मूळ परीक्षेत जसेच्या तसे (हुबेहूब) आले होते. म्हणजेच, ज्याला ‘गेस पेपर’ म्हटले जात होते, तोच प्रत्यक्षात लीक झालेला खरा पेपर होता. आता केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) याच पेपरला आधार मानून पुढील तपास करत आहे.

देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘NEET’ संशयाच्या भोवऱ्यात

देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा असलेली ‘नीट’ सध्या सर्वात मोठ्या वादात आणि संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) ढिसाळ कारभारामुळे नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट-अंडरग्रेजुएट (NEET-UG 2026) परीक्षेचा पेपर लीक झाला. या नाकर्तेपणाचा फटका देशातील २२ लाखांहून अधिक उमेदवारांना आणि त्यांच्या भवितव्याला बसत आहे. या प्रकरणी आतापर्यंत ५ राज्यांमधून १० जणांना अटक करण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकरणाच्या तपासादरम्यान, “एवढ्या कडक सुरक्षा व्यवस्थेत घेतली जाणारी ही परीक्षा नेमकी कशी फुटली?” असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. विद्यार्थ्यांपासून ते देशातील सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येक जण विचारत आहे की, या संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाइंड (सूत्रधार) नेमका कोण आहे? राजस्थानमधून सुरू झालेला हा तपास जसा पुढे सरकत आहे, तशी नवीन माहिती आणि या टोळीचे नवनवीन हस्तक समोर येत आहेत.

३ मे रोजी आयोजित करण्यात आलेली NEET-UG 2026 परीक्षा गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे अखेर रद्द करण्यात आली होती. सुरुवातीला पेपर लीकच्या बातम्या केवळ अफवा असल्याचे सांगितले गेले, परंतु जसे जसे डिजिटल पुरावे समोर आले आणि अटक सत्र सुरू झाले, तसे यामागे एक मोठे सिंडिकेट (टोळी) कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *