Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरशी संबंधित एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. मुंबईहून पुण्याकडे एका कार्यक्रमासाठी जात असताना ही घटना घडली. हेलिकॉप्टर नियोजित हेलिपॅडवर उतरवण्याऐवजी वाहनांच्या पार्किंग परिसरात उतरवण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. छगन भुजबळ यांच्यासह हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती…