Beed | बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; 28 सिलेंडर जप्त
बीड जिल्ह्यात घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणाऱ्या हॉटेल्सवर महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी छापेमारी करून घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारींची तपासणी करण्यात आली. यासाठी जिल्हाभरात तब्बल 19 पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकांनी वेगवेगळ्या भागांमध्ये 203 ठिकाणी छापेमारी करत तपासणी केली. या कारवाईदरम्यान 28 घरगुती गॅस सिलेंडर जप्त…