Headlines

petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन… पेट्रेल पंपावर मोठा राडा, चेंगराचेंगरीचा व्हिडीओ व्हायरल

petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन… पेट्रेल पंपावर मोठा राडा, चेंगराचेंगरीचा व्हिडीओ व्हायरल
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन… पेट्रेल पंपावर मोठा राडा, चेंगराचेंगरीचा व्हिडीओ व्हायरल


महाराष्ट्रात पेट्रोल पंपांवरील गोंधळाच्या घटना वाढताना दिसत आहेत. बुलढाणा जिल्ह्यात एका पेट्रोल पंपावर मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे. काही जणांनी थेट कोयता आणि तलवार घेऊन पंपावर हल्ला केला. या हल्ल्यात पेट्रोल पंपावरील कर्मचारी जखमी झाले असून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, बुलढाण्यातील दुसऱ्या एका पेट्रोल पंपावर पेट्रोल पंप सुरु होताच शेतकऱ्यांनी कॅन घेऊन मोठी गर्दी केली. पेट्रोल मिळवण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली आणि यावेळी चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. काही नागरिकांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच महाराष्ट्रातील आणखी एका पेट्रोल पंपावर बाटलीत पेट्रोल देण्यास नकार दिल्याने ग्राहक आणि कर्मचारी यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या सर्व घटनांमुळे पेट्रोल पंपांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *