Headlines

PF interest 2026: तुमच्या खात्यात जमा झाले पीएफ व्याज? या चार पद्धतीने झटपट तपासा

PF interest 2026: तुमच्या खात्यात जमा झाले पीएफ व्याज? या चार पद्धतीने झटपट तपासा
PF interest 2026: तुमच्या खात्यात जमा झाले पीएफ व्याज? या चार पद्धतीने झटपट तपासा


पीएफ व्याज झाले का जमा?Image Credit source: एजन्सी

PF Interest Rate: देशातील कोट्यवधी पगारदारांना सध्या पीएफवरील व्याजाची प्रतिक्षा आहे. आर्थिक वर्षात किती व्याजाची रक्कम द्यायची ही व्याजदरावर निश्चित होते. त्यानंतर पीएफ सदस्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्यात येते. अनेकदा असे होते की पीएफ खात्यात व्याजाची रक्कम जमा होते पण कर्मचार्‍यांना त्याची माहिती होत नाही. वेळोवेळी तुमच्या पीएफ खाते तपासल्यास, किती व्याज जमा झाले हे समोर येईल. ईपीएफओने (EPFO) 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 8.25 टक्के इतका व्याजदर निश्चित केला आहे.

व्याजदर जैसे थे

केंद्र सरकारने आर्थिक वर्षात व्याज दरात कोणताही बदल न करण्याचे ठरवले. व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय मार्च महिन्यात केंद्रीय विश्वस्त मंडाळाने (CBT) घेतला. याचा अर्थ चालू आर्थिक वर्षात पीएफ खातेदारांच्या खात्यातील रक्कमेवर 8.25 टक्के इतका जोरदार परतावा मिळेल. जर तुम्ही पीएफ खातेदार असाल तर सरकारकडून व्याजाची रक्कम तुमच्या खात्यात जमा केल्यावर घरबसल्या ती तपासता येईल.

या पद्धतीने तपासा PF बॅलन्स

अनेक कर्मचाऱ्यांना केवळ खात्यात पीएफ रक्कम जमा होते यापलिकडे फार काही माहिती नसते. या खात्यात किती रक्कम शिल्लक आहे. किती रक्कम काढता येते. खात्याची अपडेट कशी तपासावी याची माहिती नसते. तेव्हा या पद्धतीने तुम्हाला खात्याची माहिती घेता येते.

UMANG APP द्वारे तपासा बॅलन्स

स्मार्टफोनवर प्ले स्टोअरवर उमंग ॲप डाउनलोड करा

त्यानंतर तुमचा फोन नंबर रजिस्टर करा. ॲपमध्ये लॉग इन करा

त्यानंतर वरच्या डाव्या कोपऱ्यातील मेनूवर जा

इथे EPFO ​​पर्यायावर क्लिक करा

व्ह्यू पासबुकमध्ये गेल्यानंतर, OTP द्वारे तुमचा UAN क्रमांक आणि शिल्लक तपासा

एका मिस्ड कॉलवर जाणून घ्या PF मधील शिल्लक

पीएफ बॅलन्सबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर मिस्ड कॉलद्वारेही पीएफ खात्यात किती रक्कम जमा झाली हे समोर येते. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011 22901406 वर मिस्ड कॉल द्यावा लागेल.

SMS द्वारे जाणून PF रक्कम

पीएफ खात्यात किती रक्कम आहे. त्यावर किती व्याज जमा झाले हे तुम्हाला घरबसल्या मोबाईलववर कळू शकते. ईपीएफओकडे नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 7738299899 वर EPFO ​​UAN LAN (भाषा) पाठवावा लागेल. तुम्हाला इंग्रजीमध्ये माहिती हवी असल्यास, तुम्ही LAN ऐवजी ENG टाईप करावे आणि मराठी MAR लिहावे. हिंदीत माहिती हवी असेल तर EPFOHO UAN HIN लिहून संदेश पाठवावा लागेल. यानंतर लगेचच एसएमएसद्वारे शिल्लक रक्कमेची माहिती मिळेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *