Headlines

Plants that attract snakes : सापांना घरात येण्याचं निमंत्रण देतात ही फुलांची झाडं, तुमच्याही घरात आहेत का?

Plants that attract snakes : सापांना घरात येण्याचं निमंत्रण देतात ही फुलांची झाडं, तुमच्याही घरात आहेत का?
Plants that attract snakes : सापांना घरात येण्याचं निमंत्रण देतात ही फुलांची झाडं, तुमच्याही घरात आहेत का?


अनेकांना बाग कामाची आवड असते, लोकं आपल्या घरात किंवा बागेत सुंदर सुंदर फुलांची झाडं लावतात. या झाडांना आलेली फुलं सर्वाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतात, आणि या फुलांच्या सुवासाचा दरवळ तुमच्या संपूर्ण घरात तसेच बागेमध्ये पसरतो. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का? की काही फुलांची झाडं अशी देखील असतात, ती झाडं जर तुम्ही घरात लावली तर ती सापांना आकर्षित करू शकतात. या झाडांमध्ये नैसर्गिकरित्या असे काही गुणधर्म असतात, जे सापांना आपल्याकडे आकर्षित करतात, आणि सापांना लपण्यासाठी एक सुरक्षित जागा देखील निर्माण होते. त्यामुळे अशी झाडं घरात लावत असताना आवश्यक ती काळजी घेणं गरजेचं असतं.  जर तुम्ही देखील ही झाडं तुमच्या घरात लावली असेल तर त्या झाडांची नियमित देखभाल केली गेली पाहिजे, त्यामुळे साप घरात येण्याचा धोका कमी होतो.

साप फुलांच्या झाडाजवळ का जातात? 

अनेकांना असं वाटतं की साप फुलांच्या सुंगधामुळे त्या झाडाकडे आकर्षित होतात. परंतु तसं नाहीये, हा मोठा गौरसमज आहे. साप आपल्या बॉडिचं तापमान मेंटन करण्यासाठी अशा झाडाचा आधार घेतात. ते झाडांच्या सावलीखाली जाऊन बसतात. काही फुलांची झाडं ही वेल वर्गीय असतात, ती वाढल्यानंतर तेवढ्या परिसरात अडचण निर्माण होते. अशा ठिकाणी सापांना लपण्यासाठी सुरक्षित जागा सापडते त्यामुळे देखील अनेकदा साप अशा झाडांकडे आकर्षित होतात.  तसेच या झाडांच्या मुळाशी कायम ओल असल्यामुळे या ठिकाणी बेडूक तसेच उंदिर देखील असतात, त्यांना खाण्यासाठी देखील साप या ठिकाणी येतात.

जाईचं झाड हे घरात लावणं थोडं रिस्की होऊ शकतं. कारण जाईचा वेल हा खूप झपाट्याने वाढतो. तसेच या झाडाच्या मुळाशी कायम ओल असते, त्यामुळे हे झाड सापांच्या आवडीचं ठिकाण आहे. अशा ठिकाणी अनेकदा साप आढळून येतात. त्यामुळे हे झाड लावताना काळजी घ्यावी, घरी किंवा बागेत जर हे झाड लावलं असेल तर त्याची वेळच्या वेळी त्याची छाटणी करणं गरजेंच असतं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *