Headlines

Rahul Roy : डॉ.वनिता घाडगेंचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर, ‘राहुल रॉय बद्दल वाईट बोलणं म्हणजे देवाला लात मारण्यासारखं’

Rahul Roy : डॉ.वनिता घाडगेंचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर, ‘राहुल रॉय बद्दल वाईट बोलणं म्हणजे देवाला लात मारण्यासारखं’
Rahul Roy : डॉ.वनिता घाडगेंचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर, ‘राहुल रॉय बद्दल वाईट बोलणं म्हणजे देवाला लात मारण्यासारखं’


मागच्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता राहुल रॉय चर्चेत आहे. याचं कारण आहे, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या राहुल रॉयच्या काही रील्स. राहुल रॉय सोबत रील्स मध्ये दिसणारी ही महिला कोण? असा प्रश्न अनेकांना पडलेला. या महिलेचं नाव आहे डॉ. वनिता घाडेग देसाई. हे व्हिडिओ रिलीज होताच सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले. राहुल रॉयची स्थिती पाहून अनेकांना वाईट वाटलं. काहींनी त्याला ट्रोल केलं. त्याची खिल्ली उडवली. विषय वाढू लागल्यानंतर राहुल रॉयने स्वत: समोर येऊन उत्तर दिलं. राहुलला वाटलं की, तो बोलल्यानंतर विषय शांत होईल. पण कमेंटस थांबतच नव्हत्या. अखेर डॉ. वनिताने समोर येऊन ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. सत्य काय ते लोकांसमोर मांडलं आहे.

रील्स व्हायरल झाल्यानंतर राहुल रॉयने त्याच्या आर्थिक अडचणी, कायदेशीर समस्या आणि 2020 साली आलेल्या ब्रेन स्ट्रोक नंतरच आयुष्य या बद्दल इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट केली. अनेक सेलिब्रिटींनी राहुलच समर्थन केलं. पण ट्रोलिंग थांबली नाही. या दरम्यान डॉ. वनिता यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करुन आपली बाजू मांडली आहे. लोक चुकीच्या पद्धतीने व्हायरल महिला म्हणून माझ्याकडे पाहत आहेत. माझी ओळख शिक्षण आणि अचीवमेंट्सची आहे असं डॉ. वनिता म्हणाल्या. मागच्या 10 दिवसांपासून सोशल मीडियावर जे चाललय त्यामुळे त्यांना समोर येऊन स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.

राहुल रॉयबद्दल काय म्हणाल्या?

वनिताने सांगितलं की, “तिने खरंतर राहुल रॉयला रील्समध्ये काम करण्याची संधी दिली. जेव्हा आपण एखाद्याचे चाहते असतो, तेव्हा त्याच्या चांगल्याबाजू आणि कमजोरी दोन्ही स्वीकारली पाहिजे. मोठ्या पडद्यावर राहुल रॉयला संधी मिळत नव्हती, म्हणून मी रील्सच्या माध्यमातून राहुल आजही किती फिट आणि एवरग्रीन वाटतो ते दाखवण्याचा प्रयत्न केला” त्यांनी राहुल रॉयचं वय, अभिनय आणि साधेपणाचं कौतुक केलं.

म्हणजे माझ्यात काहीतरी खास नक्की आहे

“मुंबईत कोट्यवधी महिला आहेत. पण त्यांनी फक्त माझ्यासोबत रील्स बनवल्या. म्हणजे माझ्यात काहीतरी खास नक्की आहे” असं डॉ. वनिता म्हणाल्या. वनिता यांनी ट्रोलर्सचा चांगलाच समाचार घेतला. ‘आम्ही मागच्या पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखतोय’ असं डॉ. वनिता म्हणाल्या.

नातं फक्त कंटेट पुरता मर्यादीत नाही

“त्यांचं राहुल रॉय सोबतचं नातं फक्त कंटेट पुरता मर्यादीत नाही. मला हे सांगायचं नव्हतं पण ब्रेन स्ट्रोकनंतर मी राहुल रॉय यांची मदत केली होती. पुढेही करत राहीन. राहुल रॉय माझ्यासाठी गुरु समान आहेत. त्यांच्याबद्दल वाईट बोलणं म्हणजे देवाला लात मारण्यासारखं आहे” असं डॉ. वनिता म्हणाल्या.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *