
शिवसेना, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे Image Credit source: एजन्सी
Shiv Sena 60th Foundation Day Clashes : ऑपरेशन टायगरनंतर आज मुंबईत मोठा राडा होण्याची भीती आहे. उद्धव सेनेचे 6 खासदार फुटले आहेत. त्यांनी स्वतंत्र गट स्थापन्यासाठी अर्जफाटे केले आहेत. आज शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन आहे. उद्धव सेना आणि शिंदे सेना वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेणार आहेत. उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. त्याचवेळी सहा खासदार फुटल्याने राज्यभरात शिवसैनिकांमध्ये असंतोष उफाळला आहे. शिंदे सेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात काही घडण्याची शक्यता लक्षात घेत मु्ंबई पोलीस अलर्ट मोडवर आहेत.
मुंबईत मोठा राडा?
सध्या मुंबईतील अनेक चौकात उद्धव सेना आणि शिंदे सेनेचे बॅनरवॉर दिसत आहे. खासदार फुटीनंतर दोन्ही सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे. त्यातून मोठा राडा होण्याची शक्यता आहे. हिंसक स्थिती निपटण्यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत. अनेक चौका चौकात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तर अनेक ठिकाणी पोलीस तैनात आहेत. प्रत्येक घटनेवर पोलीस लक्ष ठेवत आहेत. खास करून सभेच्या ठिकाणी आणि परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
गोरेगाव आणि सायनमध्ये शक्ती प्रदर्शन
शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन दोन वेगवेगळ्या ठिकाणी साजरा होईल. उद्धव ठाकरे यांचा कार्यक्रम षण्मुखानंद परिसरात होईल. तर गोरेगाव येथे शिंदे सेना शक्तीप्रदर्शन करेल. या दोन्ही ठिकाणी दोन्ही पक्ष त्यांची ताकद दाखवतील आणि शक्ती प्रदर्शन करतील. राज्यातील अनेक जिल्ह्यातून वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी येतील. त्यामुळे त्यांच्यात या सध्याच्या घडामोडीमुळे कोणताही वाद उद्भवू नये आणि मुंबईत शांतता, कायदा सुव्यवस्था राहावी यासाठी पोलिसांची कसरत होणार आहे.
6 बंडखोरांच्या भूमिकेकडे लक्ष
संजय देशमुख
संजय जाधव
संजय दिना पाटील
नागेश पाटील आष्टीकर
भाऊसाहेब वाकचौरे
ओमराजे निंबाळकर
हे सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमस्थळी हजर राहणार का याची चर्चा रंगली आहे. या खासदारांनी अद्याप त्यांचे पत्ते उघड केलेले नाही. ते अद्याप माध्यमांसमोर आलेली नाही. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची बाजू मांडलेली नाही. हे खासदार आता कुठे आहे याविषची सस्पेन्स कायम आहे. त्यांनी स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळावी यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे अर्ज केलेला आहे. गटाला मान्यता मिळाल्यानंतर ते समोर येऊन बाजू मांडू शकतात.