Headlines

SRH vs PBKS : हैदराबादचा झंझावात, पंजाबसमोर 236 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?

SRH vs PBKS : हैदराबादचा झंझावात, पंजाबसमोर 236 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
SRH vs PBKS : हैदराबादचा झंझावात, पंजाबसमोर 236 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?


सनरायजर्स हैदराबाद टीमने घरच्या मैदानात आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) पंजाब किंग्ससमोर अवघड आव्हान ठेवलं आहे. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 235 धावा केल्या. हैदराबादसाठी एकूण 5 फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. त्यामुळे हैदराबादला 230 पार मजल मारता आली. तसेच इशान किशन आणि हेन्रिक क्लासेन या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे आता पंजाबचे फलंदाज यशस्वीरित्या विजयी धावांचा पाठलाग करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पंजाबची जबरदस्त सुरुवात

पंजाबने टॉस जिंकून हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड या सलामी जोडीने हैदराबादला आश्वासक सुरुवात मिळवून दिली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. अभिषेक आणि ट्रॅव्हिस या दोघांनी 21 बॉलमध्ये 54 रन्सची पार्टनरशीप केली. हैदराबादने अभिषेकच्या रुपात पहिली विकेट गमावली. अभिषेकने 13 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 2 फोरसह 35 रन्सची तोडू खेळी केली.

अभिषेक आऊट झाल्यानंतर इशान किशन मैदानात आला. इशान आणि ट्रॅव्हिस या दोघांकडून हैदराबादला मोठ्या भागीदारीची अपेक्षा होती. मात्र या दोघांना काही खास करता आलं नाही. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 30 रन्सची पार्टनरशीप केली. ट्रॅव्हिसने 200 च्या स्ट्राईक रेटने 19 बॉलमध्ये 38 रन्स केल्या. हेडने या दरम्यान 3 सिक्स आणि 3 फोर लगावले. हैदराबादची सलामी जोडी आऊट झाल्याने 6.4 ओव्हरमध्ये 2 आऊट 84 अशी स्थिती झाली.

इशान-क्लासेनचा तडाखा

त्यानंतर इशान किशन आणि हेन्रिक क्लासेन या जोडीने कमाल केली. क्लासेन आणि इशानने पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई करत 200 पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने पार्टनरशीप केली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 48 बॉलमध्ये 88 रन्स जोडल्या. पंजाबचा स्ट्राईक बॉलर अर्शदीप सिंह याने ही सेट जोडी फोडली. अर्शदीपने इशानला सूर्यांश शेडगे याच्या हाती कॅच आऊट केलं. इशानने 32 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 2 फोरसह 55 रन्स केल्या.

स्कोअरकार्ड


त्यानंतर नितीश रेड्डी आणि हेन्रिक क्लासेन या दोघांनी फिनिशिंग टच दिला. रेड्डी-क्लासेन जोडीने चौथ्या विकेटसाठी 32 बॉलमध्ये 63 रन्स जोडल्या. नितीशने 13 बॉलमध्ये नॉट आऊट 29 रन्स केल्या. तर क्लासेनने हैदराबादासाठी सर्वाधिक धावा केल्या. क्लासेनने 4 सिक्स आणि 3 फोरसह एकूण 69 रन्स केल्या. पंजाबसाठी अर्शदीप सिंह, लॉकी फर्ग्यूसन, युझवेंद्र चहल आणि विजयकुमार वैशाख या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *