Headlines

Sunetra Pawar : दादांचे 22 आमदार शरद पवारांना भेटल्याची चर्चा होताच सुनेत्रा पवार Action मोडवर, लवकरच घेऊ शकतात असा निर्णय

Sunetra Pawar : दादांचे 22 आमदार शरद पवारांना भेटल्याची चर्चा होताच सुनेत्रा पवार Action मोडवर, लवकरच घेऊ शकतात असा निर्णय
Sunetra Pawar : दादांचे 22 आमदार शरद पवारांना भेटल्याची चर्चा होताच सुनेत्रा पवार Action मोडवर, लवकरच घेऊ शकतात असा निर्णय


महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची चर्चा आहे. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं बोललं जातं. त्याचवेळी शरद पवार यांच्या पक्षातही सर्व खुश आहेत, अशी स्थिती नाही.त्या शिवाय दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मुद्यावरुनही दोन्ही बाजूंचे आमदार, कार्यकर्ते यांच्यात संभ्रमावस्था आहे. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवरुन वरिष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल नाराज झाल्याचं बोललं जात होतं. त्यांनी थेट शरद पवार यांची भेट घेतली. पवारांनी या दोन्ही नेत्यांचं कौतुकही केलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील विसंवाद समोर आला. निवडणूक आयोगाला सोपवलेल्या पत्रात राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्षपद असा उल्लेख नव्हता. त्याचवेळी दुसऱ्या राज्याच्या प्रदेशाध्यक्षाच्या नावासमोर मात्र स्पष्टपणे उल्लेख होता. यावरुन सर्व नाराजी नाट्याला सुरुवात झाली.

आता सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा नव्याने बसवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे यांच्यात काल बैठक पार पडली. सध्याच्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणी मधून काही नाव काढण्यात यावीत यासंदर्भात चर्चा झाली. या राष्ट्रीय कार्यकारिणी मधून एक महिला लोकप्रतिनिधी आणि सुबोध मोहिते यांना काढण्यात यावं, यासंदर्भात पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

त्या मुद्यावर शरद पवार यांचं मौन

दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीतील 22 आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार का? ही देखील चर्चा रंगत आहे. विलिनीकरणाच्या मुद्यावर शरद पवार यांनी मौन धारण केलं. ते काही बोलले नाहीत अशी सूत्रांची माहिती आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्ण विराम दिला. भविष्यात दोन्ही पक्ष एकत्र येणार नाही हे त्यांनी स्पष्ट केले. त्यावरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही आमदार आणि खासदार नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *